शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

वयानेही सर्वांत मोठा गुरू

By admin | Updated: June 16, 2017 03:51 IST

आपल्या ग्रहमालेतील गुरू हा ग्रह केवळ आकारानेच नव्हे, तर वयानेही इतर ग्रहांहून मोठा आहे, असे वैज्ञानिकांचे म्हणणे असून सूर्यानंतर ४० लाख वर्षांच्या

वॉशिंग्टन - आपल्या ग्रहमालेतील गुरू हा ग्रह केवळ आकारानेच नव्हे, तर वयानेही इतर ग्रहांहून मोठा आहे, असे वैज्ञानिकांचे म्हणणे असून सूर्यानंतर ४० लाख वर्षांच्या आत हा प्रचंड आकाराचा वायूरूप ग्रह जन्माला आला असावा, असा त्यांनी हिशेब मांडला आहे.ग्रहमाला तयार होऊन ती सध्याच्या रचनेपर्यंत कशी विकसित झाली हे समजण्यासाठी गुरू ग्रहाचे वय जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ग्रहमाला तयार होत असताना गुरू ग्रह तुलनेने लवकर तयार झाला, असा ढोबळ अंदाज यापूर्वीच्या मॉडेलवरून करण्यात आला होता, तरी गुरूच्या जन्माचा नेमका कालखंड कधी ठरविला गेला नव्हता.अमेरिकेतील लॉरेन्स लिव्हरमोर राष्ट्रीय प्रयोगशाळेतील वैज्ञानिकांच्या चमूने आता नव्या अभ्यासातून गुरूचे नेमके वय ठरविले असून त्यांचा हा शोधप्रबंध ‘प्रोसीडिंग्ज आॅफ दि नॅशनल अ‍ॅकॅडमी आॅफ सायन्सेस’ या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.या संशोधनातून वैज्ञानिकांनी असा निष्कर्ष काढला की, ग्रहमाला उदयास आल्यानंतर पहिल्या १० लाख वर्षांत गुरू ग्रहाचा गाभा पृथ्वीहून वीसपट एवढ्या आकारमानाचा झाला. त्यानंतर आणखी २० ते ३० लाख वर्षे या गाभ्याचे आकारमान वाढत राहिले व तो वाढून पृथ्वीहून ५० पट एवढ्या वस्तुमानाचा झाला.आधीचे सिद्धान्त असे मानत होते की, गुरू आणि शनी यांसारख्या प्रचंड आकाराच्या वायूरूप ग्रहांची रचना होताना आधी त्यांचा पृथ्वीहून दसपट ते वीसपट आकाराचा घनरूप गाभा तयार झाला व त्यानंतर या गाभ्यावर वायूचे आवरण चढत गेले.या वैज्ञानिक चमूचे प्रमुख थॉमस क्रुईजर यांनी सांगितले की, आमचा निष्कर्षही या प्रस्थापित सिद्धान्ताच्या अनुरूपच आहे. त्यानुसार गुरू हा आपल्या ग्रहमालेतील वयाने सर्वांत मोठा ग्रह आहे व सौर नेब्युलाच्या वायुमंडलाचे विघटन होण्याआधीच या ग्रहाचा घनरूप गाभा तयार झाला होता.या प्रयोगात वैज्ञानिकांनी उल्कांचे आयसोटोप विश्लेषण करून असा निष्कर्ष काढला की, आपल्या सूर्याची ग्रहमाला तयार होण्यास सुरुवात झाल्यानंतरच्या पहिल्या सुमारे १० लाख वर्षांतच गुरूचा घनरूप गाभा तयार झाला होता. यावरून तो ग्रहमालेतील सर्वांत आधी तयार झालेला ग्रह ठरतो.नेमका कसा काढला निष्कर्ष?प्रा. क्रुईजर म्हणाले की, गुरूचे नेमके वय ठरविण्यासाठी आमच्याकडे तेथून आणलेल्या मातीचे कोणतेही नमुने नव्हते. त्यामुळे आम्ही उल्कांवरील आयसोटोपचा अभ्यास केला. त्यात लोहउल्कांवर टंगस्टन व मॉलिबडेनम या दोन स्वतंत्र मूलद्रव्यांचे आयसोटोप आढळले. त्यावरून या उल्कांची रचना सौर नेब्युलातील दोन स्वतंत्र स्रोतांतून आलेल्या घटकांपासून झाल्याचे स्पष्ट झाले. हे दोन्ही घटक नेब्युलामध्ये एकाच वेळी तयार झाले असले तरी ग्रहमालेच्या निर्मितीनंतर ३० ते ४० लाख वर्षांपर्यंत ते एकमेकांपासून वेगळे राहिले. गुरू ग्रह तयार झाल्याने असे झाले असावे. गुरूच्या रूपाने वाटेत अडथळा निर्माण झाल्याने नेब्युलातील घटकद्रव्ये सूर्यमंडलात विखुरण्यात खंड पडला. (वृत्तसंस्था)