शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आखाती संघर्षाने तेलाचा भडका

By admin | Updated: March 27, 2015 01:34 IST

येमेनमधील बंडखोरांचा बीमोड करण्यासाठी सौदी अरेबियाने हवाई हल्ले सुरू करताच कच्च्या तेलाचे भाव भडकले आहेत.

लंडन : येमेनमधील बंडखोरांचा बीमोड करण्यासाठी सौदी अरेबियाने हवाई हल्ले सुरू करताच कच्च्या तेलाचे भाव भडकले आहेत. या संघर्षाची आग तेलसमृद्ध मध्य-पूर्वेकडील देशांना बसण्याची भीती निर्माण झाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील या भागातून होणारा तेलाचा पुरवठा विस्कळीत होऊ शकतो.सौदी आणि मित्र फौजांनी येमेनी बंडखोरांच्या अड्ड्यांवर निशाणा साधत हवाई हल्ले सुरू केल्याची खबर थडकताच आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव एकदम उसळले. अमेरिकेत कच्च्या तेलाचा वायदा भाव प्रति बॅरल ५१ डॉलरवरून ५९.७१ डॉलरवर चढला. तथापि, या संघर्षाची झळ लागलीच मध्य-पूर्वेला बसणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर भाव कमी होत ५६.५० डॉलर बॅरलवर आला.आंतरराष्ट्रीय सागरी वाहतूक मार्गावरच येमेन आहे; परंतु येमेन यादवीच्या दिशेने जात आहे. या संघर्षात इराण उतरण्याची भीती मात्र कायम आहे. या लढ्यात संयुक्त अरब अमिराती, बहरीन, कतार आणि कुवैत या देशांचा सौदी अरबला पाठिंबा आहे. हौथी बंडखोरांची आगेकूच रोखण्यासाठी सौदी अरबने उपरोक्त मित्र देशांच्या सहकार्याने हवाई हल्ले सुरू केले आहेत. इराण व सौदी अरब हे दोन्ही देश ओपेकचे (पेट्रोलियम निर्यातदारांची संघटना) सदस्य आहेत. जगभरात उत्पादित होणाऱ्या एकूण कच्च्या तेलापैकी ४० टक्के उत्पादन ओपेक सदस्य देशांत होते. युरोपला लाल सामुद्रधुनी, अ‍ॅडन व द्जिबौती बंदरातून तेल निर्यात होते.च्एडन : येमेनमधील अस्थिरतेतून यादवी युद्ध सुरू होण्याची भीती असताना, तेथील सरकारला वाचविण्यासाठी सौदी अरेबियाने आज बंडखोरांवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. आखातातील १० देशांच्या आघाडीने ही कारवाई सुरू केली असून संकटात असणारे येमेनचे अध्यक्ष अद्राबूब मन्सूर हादी यांना वाचविणे हे या मोहीमेचे मुख्य लक्ष्य आहे. फर्मनेस स्टॉर्म असे नाव या लष्करी कारवाईस देण्यात आले आहे. बंडखोरांचा इशारा सौदी अरेबियाची कारवाई हे येमेनवरील आक्रमण समजले जाईल व त्यामुळे या भागात मोठे युद्ध सुरू होईल, असा इशारा हौथी बंडखोरांचा नेता मोहम्मद अल बुखैती याने सौदी अरेबियाला दिला आहे.