शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

अरे बापरे ! सौदी अरेबियात मिळतायत पत्नीला मारहाण करण्याचे धडे

By admin | Updated: May 16, 2016 12:56 IST

पत्नीला मारहाण कशी करावी ? यासाठी चक्क रोगनिवारणतज्ञ सल्ला देत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे

ऑनलाइन लोकमत - 
रियाध, दि. 16 - पत्नीला मारहाण कशी करावी ? यासाठी चक्क रोगनिवारणतज्ञ सल्ला देत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे सौदी अरेबियामधील नॅशनल टेलिव्हिजनवर हा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला होता अशी माहिती मिळत आहे. 
 
एव्हीडी न्यूज डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार हा व्हिडिओ फेब्रुवारी महिन्यात दाखवण्यात आला होता. एप्रिल 2016 मध्ये अमेरिकेत हा व्हिडिओ दाखवण्यात आल्यानंतर ही माहिती समोर आली. वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार सौदी सरकारने परवानगी दिल्यानंतरच नॅशनल टेलिव्हिजनवर हा व्हिडिओ दाखवण्यात आल्याचं सांगितलं आहे. 
 
रोगनिवारणतज्ञ खालेद-अल-साकबे यांनी या व्हिडिओतून बायकोला मारहाण कशी आणि का करावी ? याबद्दल माहिती दिली आहे. 'बायकोला मारहाण करणे हा महत्वाचा मुद्दा आहे. यामध्ये अनेक अडथळे येत आहेत. पण अल्लाची इच्छा आहे. आपण हे अंतर सुरक्षित पार करु', असं खालेद-अल-साकबे बोलले आहेत.
 
'शिस्त लागणे हा पत्नीला मारहाण करण्याचा हेतू असून आपला राग व्यक्त करण्यासाठी नाही', असा दावा खालेद-अल-साकबे यांनी केला आहे. तसंच मारहाण करताना टोकदार वस्तू किंवा रॉडचा वापर करु नये असाही सल्ला दिला आहे. 
 
'इतकंच नाही तर मारहाण करण्याआधी पत्नीला तिला तुमच्या हक्कांची आणि तिच्या कर्त्यव्यांची जाणीव करुन द्या', असंही खालेद-अल-साकबे यांनी सांगितलं आहे. पत्नीला मारहाण करण्याचं समर्थन करताना खालेद-अल-साकबे यांनी आपण ज्याप्रकारे आपल्या पतीला वागवत आहोत ते चुकीचे आहे याची जाणीव करुन देणे त्यामागचा हेतू असल्याचं म्हटलं आहे. 
 
'दुर्दैवाने काही पत्नींना आपल्या पतीप्रमाणे समान आयुष्य जगण्याची इच्छा होते, ही खुप मोठी समस्या आहे', असं खालेद-अल-साकबे बोलले आहेत. काही पत्नी आपल्या पतीला मारहाण करण्यासाठी डिवचत असल्याचाही दावा खालेद-अल-साकबे यांनी केला आहे.