वॉशिंग्टन : राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ संपण्यास अवघी दोन वर्षे राहिली असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी टिष्ट्वटरवर आपले खाते सुरू केले आहे. अवघ्या १२ तासांतच त्यांच्या फॉलोअर्सची संख्या १४ लाख ६० हजारांवर पोहोचली आहे. याआधी ते व्हाईट हाऊसच्या खात्यावरून संदेश टाकत होते.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा वा अॅटदरेट पीओटीयूएस (@स्रङ्म३४२) नामक खात्याच्या माध्यमातून ओबामा प्रथमच थेटपणे ‘टिष्ट्वट’संवाद साधू शकणार आहेत. ओबामांनी या खात्यावरून ६५ लोकांना फॉलो केले आहे. यात एकाही परदेशी नेत्याचा समावेश नाही. (वृत्तसंस्था)‘हॅलो टिष्ट्वटर, मी बराक... खरंच! अध्यक्षपदाची सहा वर्षे पूर्ण झाली आणि आता शेवटी मला माझे खाते मिळाले .’ -ओबामांचे पहिले टिष्ट्वट
ओबामांचेही टिष्ट्वटर हँडल
By admin | Updated: May 20, 2015 02:22 IST