शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेला धमकी देणा-या दहशतवाद्यांना संपवणारच - ओबामा

By admin | Updated: September 11, 2014 12:05 IST

अमेरिकेला धमकी देणा-या दहशतवाद्यांना सोडणार नसल्याचे सांगत इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया या दहशतवादी संघटनेचे समूळ उच्चाटन करु असा निर्धार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत

वॉशिंग्टन, दि. ११ -  अमेरिकेला धमकी देणा-या दहशतवाद्यांना सोडणार नसल्याचे सांगत इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया या दहशतवादी संघटनेचे समूळ उच्चाटन करु असा निर्धार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केला आहे. अमेरिकेच्या हवाई दल आणि सैन्याच्या माध्यमातून जिथेही आयएसआयएस असेल तिथून त्यांना संपवणारच असेही ओबामा यांनी म्हटले आहे. 
राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ९/११ च्या दहशतवादी हल्ल्याला १३ वर्ष झाल्यानिमित्त बुधवारी देशवासियांना उद्देशून केलेल्या भाषणात  दहशतवादविरोधी मोहीमेची रणनिती जाहीर केली. अमेरिकेला धमकी देणा-या दहशतवाद्यांना कुठेच शरण मिळणार नाही हेच आमचे धोरण आहे असे सांगत आयएसआयएसला याचे परिणाम भोगावेच लागतील असे इशाराच त्यांनी दिला. आयएसआयएसला संपवण्यासाठी अमेरिका मोहीम राबवणार आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी आम्ही वेळेची मर्यादा ठेवलेली नाही. पण त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आम्ही कोणताही विचार करणार नाही असे त्यांनी नमूद केले.
आयएसआयएस हे इस्लामी नाहीत. कोणताही धर्म निष्पापांचा जीव घ्या असे सांगत नाही. आयएसआयएसच्या अत्याचाराचा सर्वाधिक फटका मुस्लिमांनाच बसला असून ती एक दहशतवादी संघटनाच आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. आयएसआयएसविरोधातील मोहीमेसाठी अमेरिकेला जगातील आत्तापर्यंत ३७ देशांनी अमेरिकेला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचा या देशांमध्ये समावेश नाही.