शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
3
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
4
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
5
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
6
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
7
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
8
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
9
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
10
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
11
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
12
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
13
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
14
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
15
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
16
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
17
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
18
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
19
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
20
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन

श्रीलंकेच्या आगीतील मृतांची संख्या ११ वर

By admin | Updated: April 16, 2017 00:28 IST

श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोजवळ खुल्या जागेतील एका कचरा डेपोला लागलेल्या आगीत शनिवारी आणखी पाच जण मृत्युमुखी पडले.

कोलंबो : श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोजवळ खुल्या जागेतील एका कचरा डेपोला लागलेल्या आगीत शनिवारी आणखी पाच जण मृत्युमुखी पडले. त्याबरोबर मृतांची संख्या आता ११ झाली आहे. मृतांत चार मुलांचा समावेश आहे.कोलोन्नावा येथील मीठोतमुल्ला येथे ही घटना घडली. विशाल परिसरात पसरलेल्या या कचरा डेपोला आग लागल्यामुळे सुमारे ५0 ते १00 घरे पूर्णत: जळून खाक झाली आहेत. तसेच १८0 लोक निर्वासित झाले आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. शुक्रवारी डेपोला लागलेली ही आग शनिवारीही धुमसत होती. कचरा डेपोतील कचऱ्याचा ढिगारा तब्बल ३00 फूट उंच असून हा संपूर्ण परिसर झोपड्यांनी वेढलेला आहे. झोपडपट्टीवासीयांच्या सुटकेसाठी श्रीलंका सरकारने लष्कराला पाचारण केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ४00 जवान मदत व सुटका कार्यात गुंतले आहेत. आतापर्यंत चार मुलांसह एकूण ११ लोक त्यात मृत्युमुखी पडले. मिळालेल्या माहितीनुसार, काल श्रीलंकेत पारंपरिक नवे वर्ष सुरू झाले. त्याचा उत्सव सुरू असताना कचऱ्याच्या या डोंगराला आग लागली. आगीचा मोठा गोळा उत्सवात मग्न असलेल्या झोपडपट्टीवासीयांवर कोसळला. परिसरात आणखी काही लोक अडकलेले असू शकतात, अशी भीती एका अधिकाऱ्याने व्यक्त केली. त्यांच्या शोधाचे काम लष्कर करीत आहे. आग विझविण्यासाठी हवाई दलाचे एक हेलिकॉप्टर कामाला लावण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)मनुष्यनिर्मित आपत्तीया कचरापट्टीत २३ दशलक्ष टन कचरा असून, दररोज ८00 टन कचरा ओतला जात असतो. श्रीलंकेच्या संसदेने याबाबत अलीकडेच धोक्याचा इशारा दिला होता. कचरा डेपो अन्यत्र हलविण्याच्या मागणीसाठी स्थानिक रहिवासी अनेक दिवसांपासून आंदोलन करीत होते. स्थानिक खासदार एम. एस. मरीक्कर यांनी सांगितले की, ही नैसर्गिक नव्हे, तर मनुष्यनिर्मित आपत्ती आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली आहे.