शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

आता विमानातूनही होणार उभ्याने प्रवास! कोलंबियन एअरलाइन्सची योजना

By admin | Updated: July 3, 2017 04:08 IST

बस, लोकल अशा सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांमध्ये तसेच खाजगी वाहनांमधून प्रवाशांनी उभ्यांनी प्रवास करणे नित्याचेच. पण आता

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 -  बस, लोकल अशा सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांमध्ये तसेच खाजगी वाहनांमधून प्रवाशांनी उभ्यांनी प्रवास करणे नित्याचेच. पण आता विमानामधूनही प्रवासी उभे राहून प्रवास करताना दिसण्याची शक्यता आहे. कोलंबिया एअरलाइन्स नावाच्या विमान कंपनीने तशी योजनाच आखली आहे.  प्रवाशांना स्वस्तात विमान प्रवास करता यावा यासाठी या विमान कंपनीने आपल्या विमानामधून आसनव्यवस्था काढून टाकण्याचा विचार सुरू केला आहे. उभ्याने प्रवास केल्याने अधिक प्रवाशी विमानातून प्रवास करू शकतील, आणि अधिक प्रवाशांनी प्रवास केल्याने साहजिकपणे विमानाच्या तिकिटांचे दर कमी होतील, असा कंपनीचा कायास आहे. 
स्वस्तात विमान प्रवासाची सेवा देणारी व्हिवा कोलंबिया ही कंपनी आपल्या विमानांमधून पारंपरिक आसनव्यवस्था काढून टाकण्याच्या विचारात आहे. याबाबत माहिती देताना व्हिवा कोलंबियाचे संस्थापक आणि  मुख्य कार्यकारी अधिकारी विल्यम शॉ म्हणाले, आमची विमान कंपनी विमानातून उभ्यानी प्रवास करता येण्याच्या पर्यायाचा अभ्यास करत आहे. आम्ही उभ्यांनी प्रवास करण्याविषयी लोकांना विचारले असता त्यांनी स्वस्तात प्रवास होण्यासाठी आपण काहीही करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. 
देशातील वाढत्या प्रवासी संख्येचा फायदा घेण्यासाठी आम्ही 50 नवीन 320 एअरबस खरेदी करणार असल्याचे सांगितले होते. तसेच जास्तीत जास्त प्रवासी आणि कमीत कमी प्रवास भाड्यात प्रवास घडवण्याची सुरुवात पुढील वर्षी करणार असल्याचेही नो-फ्रिल कॅरियर या कंपनीने सांगितले आहे. 
 मात्र प्रवाशांना उभ्यांनी विमान प्रवास घडवण्याची योजना काही नवी नाही. याआधी 2003 साली एअरबसने प्रवाशांसाठी उभ्या सीटची व्यवस्था करण्याची कल्पना मांडली होती. तसेच रायनियर कंपनीनेही 2010 साली अशी कल्पना मांडली होती. पण नागरी हवाई वाहतूक व्यवस्थापनाने प्रवाशांसाठी उभ्या सीट आणण्याच्या कल्पनेला अद्याप मान्यता दिलेली नाही. तसेच कुठल्याही देशाच्या  विमान वाहतूक प्रशासनांनीही या कल्पनेला मान्यता दिलेली नाही.