शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आता फेसबुक रोखणार दहशतवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2017 17:23 IST

फेसबुकने सामाजिक भान ठेवत एका वेगळ्याच विषयाला हात घातला आहे. तो विषय म्हणजे दहशतवाद.

- अनिल भापकर/ऑनलाइन लोकमत  मुंबई, दि. 16 - जगातील सगळ्यात मोठं सोशल मीडिया नेटवर्क म्हणून ओळखले जाणारे फेसबुक आपल्या युझर्सला नवीन काहीतरी देण्यास नेहमीच एक पाऊल पुढेच असतो. यावेळी मात्र पुन्हा फेसबुकने सामाजिक भान ठेवत एका वेगळ्याच विषयाला हात घातला आहे. तो विषय म्हणजे दहशतवाद. कारण सध्या अनेक दहशतवादी संघटना लोकांच्या भावना भडकावण्यासाठी तसेच इतर दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सोशल मीडिया चा वापर करताना दिसत आहे.त्यामुळे अशा समाजकंटकांना आवर घालण्यासाठी फेसबुकने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरविले आहे. फेसबुक वर जर लोकांच्या भावना भडकावण्याऱ्या पोस्ट कोणी अपलोड करण्याचा प्रयत्न केला तर अशा पोस्ट लोकांपर्यंत पोहोचण्याआधीच फेसबुककडून डिलीट केल्या जातील . हे कसे काम करते ?भावना भडकाविणारे व्हिडिओ किंवा फोटो किंवा टेक्स्ट फेसबुकवर आढळून आल्यास फेसबुक लगेच आर्टीफेशिअल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानांचा वापर करून असे व्हिडिओ किंवा फोटो किंवा टेक्स्ट लोकांपर्यंत पोहोचण्याआधीच डिलिट करून टाकेल . यासाठी फेसबुकने विशेष यंत्रणा कार्यान्वित केली आहे.आतापर्यंत जर काही आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर असेल आणि जर लोकांनी रिपोर्ट केले तरच फेसबुक असे आक्षेपार्ह पोस्ट डिलीट करत असे. आता मात्र फेसबुकने अशी यंत्रणा कार्यान्वित केली आहे की जर कोणी फेसबुक युझर्स ने काही आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडीओ अपलोड करण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे सामाजिक स्वास्थ ढवळून निघेल व काही सामाजिक तणाव निर्माण होईल तर अशा पोस्ट लगेच डिलीट केल्या जातील .आर्टीफेशिअल इंटेलिजन्स या तंत्राचा वापर करून अपलोड होणारा फोटो किंवा व्हिडीओ एखाद्या दहशवादी संघटनेशी संबधीत तर नाही ना हे फेसबुक चेक करेल तसेच इमेज मॅचिंग तंत्राच्या साहाय्याने अपलोड होणारा फोटो काही आक्षेपार्ह तर नाही ना हे ही फेसबुक चेक करेल. लँग्वेज अंडरस्टँडिंग तंत्राचा वापर करून अपलोड होणारा व्हिडिओ हा काही आक्षेपार्ह तर नाही ना हे बघितले जाईल व काही आक्षेपार्ह भाषा आढळून आल्यास व्हिडिओ डिलिट केल्या जाईल .त्यासाठी फेसबुक ने खास यंत्रणा कार्यान्वीत केली आहे. त्यामुळे यापुढे फेसबुक च्या माध्यमातून लोकांच्या भावना भडकाविण्याचे काम करणाऱ्या लोकांना आळा बसेल तसेच ज्या दहशवादी संघटना फेसबुक चा वापर करून इतर दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करत होत्या त्यालाही निश्चित आळा बसेल, अशी अशा करूया .