शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 22:14 IST

US-Iran War: इराणने होर्मुझ सामुद्रधुनी खुली ठेवण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते पाळले गेले नाही.

US-Iran War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर स्ट्रेट ऑफ होर्मुझ खुला ठेवण्याचे वचन मोडल्याचा आरोप केला आहे. तसेच, या महत्त्वाच्या जलमार्गावर अमेरिकेची कडक भूमिका कायम राहील, असे स्पष्ट करत त्यांनी इराणला तीव्र शब्दात इशाराही दिला आहे.

होर्मुझवर अमेरिकेची नजर

ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करत सांगितले की, स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून ये-जा करणाऱ्या जहाजांवर आता अमेरिकन नौदल लक्ष ठेवणार आहे. जे जहाज इराणला अवैध टोल देतील, त्यांना रोखले जाईल आणि सुरक्षित मार्ग मिळणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

समुद्री मायन्स हटवण्याची कारवाई

ट्रम्प यांनी असेही सांगितले की, समुद्रात टाकण्यात आलेल्या मायन्स हटवण्यासाठी अमेरिकेकडून कारवाई सुरू केली जाणार आहे. तसेच, शांततापूर्ण जहाजांवर हल्ला करणाऱ्यांना कठोर प्रत्युत्तर दिले जाईल.

इराणने वचन मोडले

ट्रम्प यांनी दावा केला की, इराणने होर्मुझ सामुद्रधुनी खुली ठेवण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते पाळले गेले नाही. यामुळे जागतिक व्यापार, तेलपुरवठा आणि अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे.

इस्लामाबाद चर्चेवरही भाष्य

इस्लामाबादमध्ये झालेल्या चर्चेबाबत माहिती देताना ट्रम्प म्हणाले की, ही बैठक सुमारे 20 तास चालली आणि काही मुद्द्यांवर सहमती झाली. मात्र, इराणच्या अणु कार्यक्रमावर कोणताही तोडगा निघाला नाही. बैठकीत जेडी व्हेन्स यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

अणु कार्यक्रमावरून तणाव कायम

ट्रम्प यांनी असेही स्पष्ट केले की, इराण अण्वस्त्र विकसित करण्याचा प्रयत्न सोडण्यास तयार नाही आणि हे अमेरिका कधीही स्वीकारणार नाही. इराणला कधीही अण्वस्त्र मिळू दिले जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : US Vigilance on Strait of Hormuz: Trump Issues Stark Warning

Web Summary : Trump accuses Iran of breaking its promise to keep the Strait of Hormuz open. The US Navy will monitor ships, blocking those paying illegal tolls to Iran. The US will remove sea mines and respond firmly to attacks on peaceful ships. Iran's nuclear program remains a concern.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प