शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ही मुस्लिमांवरील बंदी नाही - ट्रम्प यांचा खुलासा

By admin | Updated: January 30, 2017 05:33 IST

सात मुस्लीम देशांतून स्थलांतर करणाऱ्यांवर अमेरिकेतील प्रवेशावर घालण्यात आलेल्या बंदीच्या निषेधार्थ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकेत नागरीक निदर्शने करत आहेत

ऑनलाइन लोकमतन्यूयॉर्क, दि. 30 - सात मुस्लीम देशांतून स्थलांतर करणाऱ्यांवर अमेरिकेतील प्रवेशावर घालण्यात आलेल्या बंदीच्या निषेधार्थ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकेत नागरीक निदर्शने करत आहेत. सर्वच स्तारातून त्यांच्या या निर्णयाचा विरोध केला जात आहे. सर्वच त्यांच्यावर टीका होत असली तरी हा निर्णय योग्य असून त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी सांगितले. तसेच ही सरसकट सर्व मुस्लिमांवरील बंदी नसून त्यातून कट्टरतावादी मुस्लीम व दहशतवाद्यांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न आहे, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. याशिवाय लॉबिंग बंदी, इस्लामिक स्टेटचा पराभव करण्याची योजना तसेच राष्ट्रीय सुरक्षा परिषदेला बलशाली करण्याची योजना यांच्यावरही ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे.

इराण, इराक, लिबिया, सोमालिया, सुदान, सीरिया व येमेन या मुस्लीम देशातील व्यक्तींना ९० दिवस प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे वैध अमेरिकी व्हिसा आहे व ग्रीन कार्ड आहेत त्यांनाही याचा फटका बसला आहे.

देशातील विमानतळ आणि अन्य ठिकाणी निरीक्षण केल्यास दिसून येईल की, या आदेशाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी सुरू आहे. त्यातून जी परिस्थिती निर्माण होईल ती हाताळण्यास आम्ही तयार आहोत, असेही ट्रम्प म्हणाले.या व्यूहरचनेमुळे अमेरिका इसिसविरोधात निर्णायक पाऊल उचलू शकेल. अमेरिका तोंड देत आहे तो मूलतत्ववादी इस्लामी दहशतवाद एवढाच इसिसचा धोका नाही तर ती खूपच विषारी आणि आक्रमक संघटना आहे. ती स्वत:चे राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न करीत आहे. या संघटनेत चर्चेला, वाटाघाटींना जागा नाही, असे ट्रम्प यांनी सांगितले.