शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

युद्धासाठी तयार, उत्तर कोरियाची अमेरिकेला खुली धमकी

By admin | Updated: April 12, 2017 21:40 IST

उत्तर कोरियानं अमेरिकेला खुल्या युद्धाचं आव्हान दिलं आहे.

ऑनलाइन लोकमतसोल, दि. 12 - उत्तर कोरियानं अमेरिकेला खुल्या युद्धाचं आव्हान दिलं आहे. तसेच अमेरिकेकडून कोरिया द्विपावर नौसैनिक तैनात करण्यात आल्यानं उत्तर कोरियानं याचा निषेध व्यक्त केला आहे. युद्धासाठी भडकावल्यास अमेरिकेवर आण्विक हल्ला करू, असंही उत्तर कोरियानं ठणकावलं आहे. उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले, अमेरिकेनं उत्तर कोरियावर हल्ला करण्यासाठी घाईघाईत जे पाऊल उचललं आहे, तो एका गंभीर स्थितीत घेऊन जाणारं आहे. अमेरिकेला जसं युद्ध अपेक्षित आहे, तसं युद्धच त्यांना मिळेल,  तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियावरील मिसाइल हल्ल्यानंतर स्वतःच्या सल्लागारांना प्योंगयांगवर वचक ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. चीन उत्तर कोरियाला आण्विक शस्त्रास्त्र पुरवण्याचा कार्यक्रम थांबवणार नसल्यास अमेरिका उत्तर कोरियावर एकपक्षीय कारवाई करेल, असाही इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिला होता. तत्पूर्वी अमेरिकेनं कार्ल विन्सन युद्धनौका उत्तर कोरियाला लगाम घालण्यासाठी प्रशांत महासागरात सज्ज केली आहे, असे पॅसिफिक कमांडचे प्रवक्ते कमांडर डेव्ह बेनहॅम यांनी सांगितले होते. उत्तर कोरिया या भागाला मोठी हानी पोहोचवू शकतो, उत्तर कोरियानं याच समुद्रात क्षेपणास्त्र चाचण्या केल्या असून, तो बेजबाबदार देश असल्याचंही अमेरिकेचं मत आहे. यूएसएस कार्ल विन्सन ही विमानवाहू युद्धनौका असून, ती आता सिंगापूरकडून पश्चिम प्रशांत महासागरात तैनात करण्यात आली आहे. उत्तर कोरियाने आतापर्यंत क्षेपणास्त्र कार्यक्रम अरेरावीने पुढे नेला असून, अमेरिकेवर हा देश अण्वस्त्राचा वापर करील, अशी ट्रम्प यांना भीती आहे. उत्तर कोरियाने आतापर्यंत पाच अणुचाचण्या केल्या आहेत. काही अहवालांनुसार उत्तर कोरिया सहावी अणुचाचणी करण्याच्या तयारीत असून, येत्या दोन वर्षांत अणुबॉम्ब बनवण्याच्या क्षमतेत वाढ करण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाने जपानच्या सागरात आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी केली होती. फेब्रुवारी महिन्यात उत्तर कोरियानं लागोपाठ चार आंतरखंडीय क्षेपणास्त्रे पूर्व किनाऱ्यावर सोडली होती, त्यातील तीन जपानच्या अगदी जवळ पडली. गेल्या ऑगस्टमध्ये त्यांनी पाणबुडीतून आंतरखंडीय क्षेपणास्त्र सोडले ते जपानच्या दिशेने 500 किमी अंतर कापत गेले असल्यानं जपानही सतर्क झाला आहे.