शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

उत्तर कोरियाचा जगभर ‘अणु’कंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2016 06:00 IST

उत्तर कोरियाने शुक्रवारी सकाळी अण्वस्त्राची यशस्वी चाचणी केल्यामुळे जगभरातील सर्व देशांमध्ये प्रचंड खळबळ माजली

सोल : उत्तर कोरियाने शुक्रवारी सकाळी अण्वस्त्राची यशस्वी चाचणी केल्यामुळे जगभरातील सर्व देशांमध्ये प्रचंड खळबळ माजली असून, जागतिक शेअर बाजारांवरही त्याचा परिणाम झाला; आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड तेलाचे भाव खाली आले. भारतात सेन्सेक्स, निफ्टी, सोने, चांदी, रुपये हे सारे घसरल्यामुळे बाजारपेठेत अस्वस्थता होती. आमच्या अणुशास्त्रज्ञांनी नव्याने विकसित केलेल्या शस्त्राचा देशाच्या उत्तरेकडील अणुचाचणी ठिकाणी स्फोट घडविला, अशी घोषणा उत्तर कोरियाच्या दूरचित्रवाणीवरून करण्यात आली. ही चाचणी उत्तर कोरियाची सर्वांत मोठी म्हणजे १० किलो टन एवढी आहे.उत्तर कोरियाने केलेल्या या अणुचाचणीची क्षमता ५.३ तीव्रतेच्या भूकंपाएवढी होती. हिरोशिमा शहरावर टाकण्यात आलेल्या १५ किलो टन अणुबॉम्बपेक्षा किंचित कमी ही चाचणी होती, असे साऊथ मेटेओरोलॉजिकलचे किम नाम-वूक यांनी म्हटले. या चाचणीमुळे जगाच्या अनेक भागांत भूकंपाप्रमाणे लहान-मोठे धक्के जाणवले. चीनसह जगातील जवळपास सर्व राष्ट्रांनी उत्तर कोरियाच्या या अणुचाचणीचा कडक शब्दांत निषेध केला असून, यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते, असा इशारा चीनने दिला आहे. चीन हा उत्तर कोरियाचा मित्र आहे. अमेरिकेने या चाचणीनंतर उत्तर कोरियाला गंभीर परिणामाचा इशारा दिला आहे. (वृत्तसंस्था)>दक्षिण कोरियाने केला निषेधदक्षिण कोरियाने याचा निषेध करून उत्तर कोरियाचा तरुण सत्ताधारी किम जोंग-ऊन याचा हा ‘वेडपट अविचारीपणा’ स्वत:च्याच नाशाकडे घेऊन जाईल, असे म्हटले आहे. ही चाचणी घेण्याच्या आधी उत्तर कोरियाने अनेक क्षेपणास्त्रांचीही चाचणी केली होती व तिचा आंतरराष्ट्रीय पातळीवर तीव्र निषेधही झाला होता. संयुक्त राष्ट्रांनी त्या देशावर निर्बंधही लादले आहेत. उत्तर कोरियाचा किम जोंग ऊन विक्षिप्त स्वभावाबद्दल आणि हुकूमशाही वागणुकीबद्दल ओळखला जातो. मंत्रिमंडळाच्या बैठकीत डुलकी लागली, असा आरोप ठेवून त्याने उपपंतप्रधानांना अलीकडेच फाशीची शिक्षा दिली होती.>चाचणी खेदजनकव्हिएन्ना : ही आणि आतापर्यंतची पाचवी अणुचाचणी खूपच ‘त्रासदायक आणि खेदजनक’ असल्याची प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्रांच्या अ‍ॅटॉमिक वॉचडॉगने व्यक्त केली. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने आतापर्यंत केलेल्या अनेक ठरावांचे या चाचणीने उल्लंघन केले आहे व आंतरराष्ट्रीय समुदायाने वारंवार केलेल्या आवाहनांचा ही चाचणी अवमान असल्याचे इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक एनर्जी एजन्सीचे प्रमुख युकिया अमॅनो यांनी म्हटले.>व्हिएतनाममध्ये एसिआन परिषद संपत असतानाच अण्वस्त्रबंदीची भाषा केली. त्यानंतर काही तासांतच उत्तर कोरियाने अण्वस्त्राची चाचणी केल्यामुळे या परिषदेतील देशांनाही धक्का बसला आहे.