शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मनी लॉण्ड्रिंग विरोधात स्वीसमध्ये नवे नियम

By admin | Updated: November 12, 2015 23:46 IST

काळा पैसा लपवून ठेवण्याचे सर्वोत्तम ठिकाण म्हणून निर्माण झालेला लौकिक पुसून टाकण्याचा प्रयत्न म्हणून स्वीत्झर्लंड सरकारने मनी लाण्ड्रिंगविरोधात नवे नियम लागू केले आहेत

झुरिच : काळा पैसा लपवून ठेवण्याचे सर्वोत्तम ठिकाण म्हणून निर्माण झालेला लौकिक पुसून टाकण्याचा प्रयत्न म्हणून स्वीत्झर्लंड सरकारने मनी लाण्ड्रिंगविरोधात नवे नियम लागू केले आहेत. बुधवारी या नियमांची घोषणा स्वीस सरकारच्या वतीने करण्यात आली.इंटरगव्हर्नमेन्टल फायनान्शिअर टास्क फोर्सच्या वतीने गेल्यावर्षी या नियमांची शिफारस करण्यात आली होती. १ लाख स्वीस फ्रँकपेक्षा जास्त रकमेचे रोख पेमेंट स्वीकारताना काही नवे नियम स्थापन करण्याची शिफारस टास्क फोर्सने केली होती. त्याचीच आता अंमलबजावणी केली जात आहे.स्वीस सरकारच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, धार्मिक संस्थांच्या नोंदणीसाठी स्वीत्झर्लंडमध्ये नवे नियम लागू होणार आहेत. पुढील वर्षांपासून हे नियम लागू होतील. करचुकविणाऱ्या बड्या पैसेवाल्यांसाठी स्वीत्झर्लंड पैसे लपविण्याचा स्वर्ग ठरला आहे. गेल्या कित्येक दशकांपासून जगभरातील श्रीमंत लोक आपला काळा पैसा स्वीत्झर्लंडमध्ये दडवून ठेवत असत. अलीकडच्या काळात या बाबतीत मोठा गवगवा झाल्याने स्वीस सरकारच्या अडचणी वाढल्या होत्या. यंदा खाजगी स्वीस बँक एचएसबीसीची काही गोपनीय कागदपत्रे फुटली. त्यासोबत स्वीस बँकांचे काळ्या पैशाचे बिंगही फुटले. त्यावरून सरकारच्या अडचणी वाढल्या होत्या. जगभरातून येणाऱ्या दबावानंतर स्वीस बँकांच्या संघटनेने जून महिन्यात मनी लॉण्ड्रिंगविरोधी उपाय योजण्याची घोषणा केली होती. पुढील वर्षापासून बँकांच्या व्यवहारांत पारदर्शकता आणण्यासाठी काही नियम करण्यात येतील, असेही बँकांच्या संघटनेने म्हटले होते.