बर्लिन : जर्मनीतील सगळ्यात मोठी वाहन निर्माती कंपनी फोक्सवॅगन कंपनीच्या विरोधातील नव्या आरोपांच्या चौकशीचे आदेश जर्मन सरकारने दिले आहेत. कंपनीने युरोपातील बाजारात विकलेल्या ९८ हजार पेट्रोल कारच्या कार्बन डाय आॅक्साईड उत्सर्जनात फसवणूक केल्याचा आरोप आहे.जगभर कंपनीने विकलेल्या १.१ कोटी डिझेल कारमधून बाहेर पडणाऱ्या उत्सर्जनाबाबत फसवणूक केली असल्याचा आरोप तर कंपनीवर गेल्या सप्टेंबरमध्ये आधीच झालेला आहे. कार्बन उत्सर्जनाच्या फसवणूक प्रकरणानंतर फोक्सवॅगनच्या पेट्रोल कार्समध्येही गैरप्रकार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. फोक्सवॅगन कंपनीने अमेरिकेत विकलेल्या हजारो डिझेल कार्समध्ये चुकीचे आकडे दाखविणारे यंत्र बसविले होते.
फोक्सवॅगनवरील नव्या आरोपाचीही चौकशी
By admin | Updated: November 6, 2015 00:50 IST