शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

भारतविरोधासाठी नेपाळचा वापर कदापी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 01:06 IST

भारतविरोधी कारवायांसाठी नेपाळच्या भूमीचा कदापि वापर करू देणार नाही, असे आश्वासन नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शनिवारी दिले.

काठमांडू: भारतविरोधी कारवायांसाठी नेपाळच्या भूमीचा कदापि वापर करू देणार नाही, असे आश्वासन नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शनिवारी दिले.नेपाळ दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चेनंतर ओली म्हणाले की, भारताची नेपाळविषयी असलेल्या मैत्री व सद्भाव याची आम्हाला कदर आहे. भारत व नेपाळ यांच्यातील सीमा १८५0 किलोमीटरची असून, तेथून जनतेची सतत ये-जा असते. त्यामुळेच नेपाळच्या भूमीचा भारतविरोधी कारवायांसाठी वापर होऊ न देणे, हे आमचे कर्तव्य आहे.नरेंद्र मोदी यांनी काल पंतप्रधान के. पी. ओली, राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी, उपराष्ट्रपती नंदबहादुर पन, नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीपकुमार ज्ञावली यांच्याशी चर्चा केली, तर आज माजी पंतप्रधान व कम्युनिस्ट पक्षाचे नेते पुष्पकमल दहल उर्फ प्रचंड, शेरबहादुर देवबा, राष्ट्रीय जनता पार्टीचे प्रमुख महन्त ठाकूर यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांची चर्चा केली. संध्याकाळी ते दिल्लीला पोहोचले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दोन दिवसांच्या नेपाळ दौºयात शनिवारी पशुपतीनाथ मंदिरात तसेच मुक्तिनाथ मंदिरात जाऊ न पूजाअर्चा केली. नेपाळमधील ही दोन्ही मंदिरे अतिशय प्रसिद्धअसून, मुक्तिनाथ मंदिरात तर हिंदुंप्रमाणेच बौद्ध समाजाचेही लोक जातात. मुक्तिनाथ मंदिरात जाणारे नरेंद्र मांदी हे पहिले जागतिक नेते आहेत.मुक्तिनाथ मंदिर हे समुद्रसपाटीपासून १२ हजार १७२ फूट उंचीवर आहे. या मंदिरात भगवान विष्णूची सोन्याची मूर्ती असून, मुक्तिनाथ म्हणून त्यांची केली जाते. या मंदिराला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले परदेशी पाहुणे आहेत, असे नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी शुक्रवारीच सांगितले होते. मुक्तिनाथ मंदिरानंतर बागमती नदीच्या तीरावरील पशुपतीनाथाच्या मंदिरात त्यांनी काही वेळ घालवला. नेपाळमधील सर्वात प्राचीन शिव मंदिर म्हणून त्याची ओळख आहे. तेथील अभ्यागतांच्या वहीमध्ये त्यांनी आपल्या भावनाही लिहिल्या. मोदी यांनी काल जनकपूरच्या जानकी मंदिरालाही भेट दिली होती.