शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

देश सोडून पळून जाणार नवाज शरीफ !

By admin | Updated: April 6, 2017 13:52 IST

आजारपणाचा बहाणा करून उपचारासाठी बाहेर देशात जाऊन पुन्हा पाकिस्तानात न परतण्याचा शरीफ यांचा विचार...

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 6 - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ देश सोडून पळून जाणार असल्याच्या अफवांना पाकमध्ये काही दिवसांपासून ऊत आला आहे. पनामागेट घोटाळ्यात अडचणी वाढल्यामुळे शरीफ पाकिस्तान सोडून जाणार असल्याची येथे जोरदार चर्चा आहे. 
 
आजारपणाचा बहाणा करून उपचारासाठी बाहेर देशात जाऊन पुन्हा पाकिस्तानात न परतण्याचा त्यांचा विचार आहे अशा अफवा अनेक दिवसांपासून पाकिस्तानात पसरत आहेत.  शरीफ हे देश सोडणार असल्याचं सांगत विरोधीपक्षाकडूनही सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. काही दिवसांपूर्वी शरीफ यांचं नाव पनामागेट घोटाळ्यात आलं होतं. तेव्हापासून ते देश सोडणार असल्याची चर्चा येथे रंगली आहे. 
 
दुसरीकडे, शरीफ देश सोडून पळून जाणार असल्याच्या वृत्ताचा नवाज शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (PML-N) ने खंडन केलं आहे.  पाकिस्तानच्या पंतप्रधानांविरोधात विरोधी पक्षांकडून रचण्यात आलेला हा कट आहे, ते जाणूनबुजून अफवा पसरवत आहेत, सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय येईल तो आम्हाला मान्य असेल असं पीएमएलएनकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
 
पनामागेट प्रकरणावर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने आपला निर्णय सुरक्षित ठेवला आहे.  
 
गेल्यावर्षी ऑपरेशनसाठी नवाज शरीफ लंडनला गेले होते. त्यावेळीही पनामागेट प्रकरणात होणा-या संभावित कारवाईपासून वाचण्यासाठी शरीफ देशाबाहेर गेले असून आता ते देशात परतणार नाहीत अशी येथे चर्चा होती.  
 
नवाज शरीफ यांना किडनी स्टोन झाल्यामुळे रूग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. रूग्णालयातून त्यांना सुट्टी मिळाली असून 4 दिवसांच्या आरामानंतर शरीफ राजधानी इस्लामाबादमध्ये आहेत. त्यांची प्रकृती आता उत्तम आहे असं स्पष्टीकरण पीएमएलएनकडून देण्यात आलं आहे.