शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जगभर निनादले भारतीय राष्ट्रगीत

By admin | Updated: August 16, 2016 01:12 IST

जगाच्या कानाकोपऱ्यांतील भारतीयांनी सोमवारी तिरंगा ध्वज फडकावून आणि राष्ट्रगीत गाऊन स्वातंत्र्य दिन साजरा केला. चीन, अमेरिका, थायलंड आणि सिंगापूरमधील भारतीयांनी

बीजिंग/ वॉशिंग्टन : जगाच्या कानाकोपऱ्यांतील भारतीयांनी सोमवारी तिरंगा ध्वज फडकावून आणि राष्ट्रगीत गाऊन स्वातंत्र्य दिन साजरा केला. चीन, अमेरिका, थायलंड आणि सिंगापूरमधील भारतीयांनी राष्ट्रभक्तीपर गीते गाऊन आणि नृत्य सादर करून विविधतेत सामावलेल्या एकतेचे दर्शन घडविले. चीनमध्ये भारतीय राजदूत विजय गोखले यांनी दूतावासाच्या आवारात राष्ट्रध्वज फडकावला. तेथील कर्मचाऱ्यांसह अन्य भारतीयही आपापल्या कुटुंबीयांसह या कार्यक्रमात सहभागी झाले. गोखले यांनी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे अभिभाषण वाचून दाखविले. त्यानंतर राष्ट्रभक्तीपर गीते सादर करण्यात आली. शांघाय येथे भारतीय उच्चायुक्त प्रकाश गुप्ता यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. त्यांनी राष्ट्रध्वज फडकावला आणि राष्ट्रपतींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे वाचून दाखविले. अशाच स्वरूपाचा कार्यक्रम गाँगझो येथील भारतीय उच्चायुक्त कार्यालयात झाला. उच्चायुक्त वाय. के. सैलास थांगल अध्यक्षस्थानी होते. अमेरिकेतील कॅलिफोर्निया आणि न्यू जर्सी येथे भारताचा स्वातंत्र्य दिन भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. हजारो भारतीयांनी त्यात सहभागी होत येथील विविधरंगी संस्कृतीचे दर्शन घडवले. डल्लास, ह्युस्टन, शिकागो, आॅरलँडो या शहरांतील भारतीयांच्या संघटनांनी शनिवारपासूनच विविध कार्यक्रम आयोजित केले होते. बँकॉक येथील भारतीय राजदूत भावंत सिंग बिश्णोई म्हणाले, ‘थायलंड हा पूर्वीपासूनच भारताचा अतिशय जवळचा मित्र देश आहे. आपल्या द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टीने २०१६ हे वर्ष अतिशय महत्त्वाचे ठरले. व्यक्ती-व्यक्तींतील बंध हा या दोन देशांतील सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. भारतीय समाजाची भूमिका या संबंधांच्या केंद्रस्थानी आहे. भारतीयांनी थायलंडच्या सांस्कृतिक आणि आर्थिक विकासासाठी दिलेले योगदान मोलाचे आहे.’ या कार्यक्रमाला सुमारे ५०० भारतीय उपस्थित होते. सिंगापूर येथे भारतीय उच्चायुक्तालयात झालेल्या कार्यक्रमात सुमारे ६०० भारतीय सहभागी झाले. उच्चायुक्त विजय ठाकूर सिंह यांनी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे अभिभाषण वाचून दाखविले. तेथे एका सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते आणि नृत्ये सादर केली. सिंगापूर, मलेशिया, थायलंड, म्यानमार येथेही भारताचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. (वृत्तसंस्था) - सिंगापूर येथे भारतीय उच्चायुक्तालयात झालेल्या कार्यक्रमात सुमारे ६०० भारतीय सहभागी झाले. उच्चायुक्त विजय ठाकूर सिंह यांनी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे अभिभाषण वाचून दाखविले. तेथे एका सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते आणि नृत्ये सादर केली.