शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी यांची विविध नेत्यांशी चर्चा

By admin | Updated: September 6, 2016 04:02 IST

आण्विक पुरवठादार गटाच्या (एनएसजी) सदस्यत्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तुर्कीचे अध्यक्ष रिसिप तय्यिप एर्दोगॅन यांच्याशी चर्चा केली

हँगझोऊ (चीन) : आण्विक पुरवठादार गटाच्या (एनएसजी) सदस्यत्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तुर्कीचे अध्यक्ष रिसिप तय्यिप एर्दोगॅन यांच्याशी चर्चा केली तसेच स्कॉर्पिन या भारतीय पाणबुडींशी संबंधित गोपनीय माहिती फुटल्याचा विषय फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉईस होलँड यांच्याकडे उपस्थित केला. जी-२० देशांच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा येथे झाली. त्याआधी मोदी यांनी ब्रिटनच्या नूतन पंतप्रधान थेरेसा मे यांच्याशी ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतरच्या परिस्थितीत उभय देशांना किती संधी मिळू शकतात याची चाचपणी करण्यासाठी चर्चा केली. एर्दोगॅन यांच्याशी ४८ सदस्यांच्या आण्विक पुरवठादार गटाच्या सदस्यत्वासाठी मोदी यांनी चर्चा केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी दिली. भारताच्या सदस्यत्वाला चीन व तुर्कस्तानने एनएसजीच्या सोलमध्ये विरोध केलेला होता. भारताने अण्वस्त्रे प्रसारबंदी करारावर (एनपीटी) स्वाक्षरी केलेली नाही, असे चीनने सांगून आक्षेप घेतला होता. गेल्या जुलैमध्ये तुर्कस्तानमध्ये एर्दोगॅन यांची सत्ता उलथून टाकण्यासाठी अयशस्वी बंड झाले होते. त्यामागे मुस्लीम धर्मगुरू फेतुल्लाह गुलेन यांची योजना होती. या गुलेन यांचे पाठिराखे भारतात राहात असल्याचा मुद्दा तुर्कीने विरोध करताना घेतला होता. (वृत्तसंस्था)