शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींनी नेपाळला दिला 'HIT' फॉर्म्यूला

By admin | Updated: August 3, 2014 18:50 IST

नेपाळ आणि भारतामधील संबंध दृढ करण्यावर भर देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेपाळला 'HIT' फॉर्म्यूला दिला आहे. नेपाळला भारताकडून १० हजार कोटी नेपाळी रुपयांची मदतही नरेंद्र मोदींनी जाहीर केली आहे.

ऑनलाइन टीम

काठमांडू, दि. ३ -  नेपाळ आणि भारतामधील संबंध दृढ करण्यावर भर देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेपाळला 'HIT' फॉर्म्यूला दिला आहे. यात H - हाय वे ( महामार्ग), I - इन्फो वे (इंटरनेट आणि डिजीटलायजेशन)  आणि T - ट्रान्स वे (दळणवळण आणि वितरण) याचा समावेश असून या HIT मुळे नेपाळ विकासामध्ये हिमालयाऐवढ्या उंचीवर जाऊ शकतो असे मोदींनी म्हटले आहे. नेपाळला भारताकडून १० हजार कोटी नेपाळी रुपयांची मदतही नरेंद्र मोदींनी जाहीर केली आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी संध्याकाळी नेपाळच्या संसदेला संबोधित केले. मोदींनी नेपाळी भाषेतून भाषणाला सुरुवात करुन नेपाळच्या लोकप्रतिनिधींची मने जिंकली. भारत आणि नेपाळमधील संबंध हिमालय आणि गंगेऐवढे जुने असून दोन्ही देश ह्रदयाने जोडली आहेत. नेपाळला दुःख झाल्यास आम्हालाही दुःख होते. या अतूट नात्याला नवीन उंचीवर नेण्याची गरज मोदींनी व्यक्त केली. 
भारताला नेपाळमध्ये ढवळाढवळ करायची नसून नेपाळला विकासकार्यात साथ द्यायची आहे. नेपाळने नवीन उंची गाठावी हीच आमची इच्छा असल्याचे मोदींनी सांगितले. नेपाळने महामार्ग, इंटरनेटचे जाळे आणि दळणवळण - वितरणाचा विस्तार केल्यास हा देश हिमालयऐवढी प्रगती करु शकतो.  विशाल पाणी संपत्ती लाभलेल्या या देशाने फक्त भारताला वीज विकल्यास त्या देशाची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. आम्हाला नेपाळकडून वीज फुकट नको आणि वीजप्रकल्पामुळे तुमचे पाणीही वाया जाणार नाही असे मोदींनी आवर्जून सांगितले. सध्या आम्ही नेपाळला वीज देत असलो तरी दशकभरानंतर आम्हाला नेपाळकडून वीज घ्यायला मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मोदींचा जोर नेपाळमधील ५,४०० मेगावॅटचा खोळंबलेला प्रकल्प मार्गी लावण्यावर होता. या प्रकल्पाला नेपाळमधील केंद्रीय मंत्रिमंडळाने विरोध दर्शवला होता. 
यूद्ध ते बुद्ध असा प्रवास करणा-या नेपाळने जगाला चांगला संदेश दिला. शस्त्रांऐवजी शास्त्रांद्वारे समस्यांवर मात करता येते हे नेपाळने जगासमोर दाखवले. याद्वारे हिंसेवर विश्वास ठेवणा-या देशांना एक नवा संदेश देता आला. आता लोकशाहीला पुरक असे सक्षम संविधान निर्माण केल्यास नेपाळचे नाव जागतिक स्तरावर सुवर्ण अक्षरात लिहीले जाईल असे मोदींनी सांगितले. महाकाली नदीवर पुल बांधल्यास भारत - नेपाळ आणखी जवळ येतील असे मोदींनी नमूद केले.