शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

नरेंद्र मोदी-डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 23:19 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सोमवारी संरक्षण आणि सुरक्षेसह अनेक महत्वाच्या विषयांवर द्विपक्षीय चर्चा झाली.

ठळक मुद्दे दक्षिण चीन समुद्रामध्ये चीनच्या वाढत्या अरेरावीच्या पार्श्वभूमीवर या चार देशांची आघाडी स्थापन करण्याचा विचार झाला.

मनिला : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सोमवारी संरक्षण आणि सुरक्षेसह अनेक महत्वाच्या विषयांवर द्विपक्षीय चर्चा झाली. अशियायी देशांच्या शिखर परिषदेनिमित्त उभय नेते येथे आलेले आहेत. व्यूहरचनेच्यादृष्टिने अत्यंत महत्वाचा असलेला इंडो-पॅसिफीक विभाग खुला आणि समावेशक ठेवण्यासाठी भारत, अमेरिका, जपान आणि आॅस्ट्रेलियाच्या अधिकाºयांनी चर्चा केल्यानंतर मोदी-ट्रम्प यांच्यात चर्चा झाली. त्यांच्यात विभागातील सुरक्षेच्या परिस्थितीसह आपापसातील द्विपक्षीय व्यापाराला प्रोत्साहन देण्यासह इतर अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. दक्षिण चीन समुद्रामध्ये चीनच्या वाढत्या अरेरावीच्या पार्श्वभूमीवर या चार देशांची आघाडी स्थापन करण्याचा विचार झाला. व्यूहरचनेच्यादृष्टिने महत्वाच्या असलेल्या इंडो-पॅसिफीक विभागात भारताला मोठी भूमिका असल्याला अमेरिकेने पाठिंबा दिला आहे. ट्रम्प यांनी केलेल्या ‘इंडो-पॅसिफीक’ शब्दप्रयोगाने अमेरिका चीनच्या वाढत्या अरेरावीला शह देण्यासाठी भारत, अमेरिका, जपान व आॅस्ट्रेलियाची आघाडी पुन्हा जिवंत करण्याच्या प्रयत्नांत असल्याच्या चर्चांना तोंड फुटले. ट्रम्प यांनी भारताने त्याच्या अर्थव्यवस्थेला मोकळे केल्यानंतर केलेल्या विस्मयकारक प्रगतीची आणि नरेंद्र मोदी यांची शनिवारी प्रशंसा केली होती. मोदी हे अवाढव्य भारत देश आणि त्याच्या लोकांना एक करण्यासाठी यशस्वीपणे काम करीत आहेत, असेही ते म्हणाले होते. एक अब्ज लोकसंख्येच्या भारतातील सार्वभौम आणि जगातील सगळ््यात मोठ्या लोकशाहीचेही त्यांनी कौतूक केले होते.