शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

लंडन हल्ल्यातील दहशतवाद्यांची नावे उघड

By admin | Updated: June 6, 2017 00:08 IST

लंडनमध्ये काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभाग असलेल्या दहशतवाद्यांची नावे पोलिसांनी जाहीर केली आहेत. यातील एका दहशतवाद्याचे

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 5 - लंडनमध्ये काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभाग असलेल्या दहशतवाद्यांची नावे पोलिसांनी  जाहीर केली आहेत.  यातील एका दहशतवाद्याचे नाव खुर्रम बट्ट (27) असून, विवाहित असलेला खुर्रम अनेक वर्षांपासून पूर्व लंडनमध्ये राहत आहे. तर दुसऱ्या हल्लेखोराचे नाव रशिद रिदवान (30) आहे. यातील खुर्रमचा जन्म पाकिस्तानमध्ये झालेला असून, तो ब्रिटिश नागरिक आहे. तर रशिदचा संबंध मोरोक्को लिबियाशी आहे.  
 
ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये गजबजलेल्या बाजारपेठेत लंडन ब्रिजवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 8 जण ठार तर 48 जण जखमी झाले होते. हातात चाकू आणि नकली आत्मघातकी जॅकेट परिधान करून हे अतिरेकी आले होते. 8 जून रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी तीनही हल्लेखोरांना गोळ्या घालून ठार मारले. 
हा हल्ला शनिवारी रात्री स्थानिक वेळेनुसार, दहाच्या सुमारास झाला. या हल्लेखोरांनी एक व्हॅन लंडन ब्रिजवर गर्दीत घुसवली. जवळच्याच बाजारपेठेत त्यांनी नागरिकांवर चाकूने हल्ला केला. प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार, हे तीन जण व्हॅनमधून आले होते आणि ‘हे अल्लाहसाठी आहे’ असे ते म्हणत होते. पोलिसांनी सांगितले की, जखमी 48 नागरिकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हा हल्ला आठ मिनिटे सुरू होता. ज्या भागात बार, रेस्टॉरंट, क्लब आहेत त्याच भागात हा हल्ला झाला.