शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नमाज नियमित अदा केली; तरच कर्मचाऱ्यांना वेतनवाढ

By admin | Updated: February 27, 2017 04:42 IST

रोजची प्रार्थना (नमाज) नियमितपणे व वेळांची कटाक्षाने पालन करून केली तरच मिळणार आहे.

इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) न्यायालयीन कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ त्यांनी जर न्यायालय आणि न्यायालयाबाहेर रोजची प्रार्थना (नमाज) नियमितपणे व वेळांची कटाक्षाने पालन करून केली तरच मिळणार आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या सर्वोच्च न्यायालयाचे १२ वे मुख्य न्यायमुर्ती म्हणून इब्राहीम झिया यांनी शनिवारी शपथ घेतली. झिया यांनी न्यायालयीन कर्मचाऱ्यांना रोजच्या प्रार्थनेच्या वेळांचे कटाक्षाने पालन करण्याचे आदेश दिले, असे वृत्त ‘द एक्स्प्रेस ट्रिब्युन’ने दिले. न्यायालयीन कर्मचारी नमाज नियमितपणे व वेळच्यावेळी अदा करतात की नाही यावर त्यांची वार्षिकवेतनवाढ अवलंबून आहे, असे झिया यांनी सर्व न्यायालयीन कर्मचाऱ्यांना प्रार्थना करणे बंधनकारक केल्याचे जाहीर करताना सांगितले. यामुळे कर्मचारी रोजची प्रार्थना नियमितपणे व त्याच्या वेळा पाळून करतील व स्वत: काही प्रार्थनांचे नेतृत्व करतील, असे ते म्हणाले. कर्मचारी नियमितपणे प्रार्थना करतात की नाही यावर न्यायालयाचे गुप्तपणे लक्ष असेल. (वृत्तसंस्था)>लक्ष कसे ठेवणार?लोकांना वेगाने न्याय मिळावा यासाठी समर्पण भावनेने, प्रामाणिकपणे व नियमितपणे काम करण्याचा सल्ला झिया यानी न्यायालयीन कर्मचाऱ्यांना दिला. न्यायालयाबाहेरील प्रार्थनेवर ते नेमके कसे लक्ष ठेवणार हे स्पष्ट नाही.