शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

म्यानमारच्या खाणीत मिळाला १७५ टनांचा पाचू!

By admin | Updated: October 18, 2016 04:55 IST

उत्तर म्यानमारच्या (ब्रह्मदेश) काचिन राज्यातील मौल्यवान खड्यांच्या एका खाणीत तब्बल १७५ टन वजनाचा पाचूचा दगड सापडला

यांगून (रंगून) : उत्तर म्यानमारच्या (ब्रह्मदेश) काचिन राज्यातील मौल्यवान खड्यांच्या एका खाणीत तब्बल १७५ टन वजनाचा पाचूचा दगड सापडला, तेव्हा खाण कामगार थक्क झाले.हा पाचूचा दगड साधारण दोन लहान आकाराच्या घरांएवढा असून त्याची उंची ९ फूट व लांबी १८ फूट आहे. आजच्या बाजारभावाने याची किंमत सुमारे १७ कोटी अमेरिकन डॉलर (अंदाजे १,१०० कोटी रुपये) होईल, असा अंदाज आहे.वजनाचा विचार केला तर जगात आजवर खाणीतून काढला गेलेला हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात वजनदार पाचूचा दगड आहे. चीनमधील जेड बुद्धा पॅलेसमधील पहुडलेल्या बुद्धाचा पुतळा ज्या अखंड पाचूच्या दगडातून कोरलेला आहे, तो जगातील सर्वात मोठा पाचूचा दगड मानला जातो. खाणीतून काढला तेव्हा त्याचे वजन २६० टन एवढे होते.खाणीतून काढलेल्या पाचूच्या ओबडधोबड दगडापासून सुबक, आकर्षक आकाराचे पाचूचे मौल्यवान खडे व त्यापासून रत्नाभूषणे, पुतळे व अन्य कलावस्तू तयार करण्याचा मोठा उद्योग चीनमध्ये चालतो. हा काचिनचा पाचूही पुढील प्रक्रिया करण्यासाठी चीनला पाठविला जाईल.लंडनच्या ‘डेली मेल’ने हे वृत्त दिले. ज्या खाण कामगारांनी हा पाचूचा दगड खणून काढला त्यांच्यापैकी एक साओ मिन म्हणाला, ‘आम्हाला जणू लॉटरी लागल्यासारखेच वाटले. पण ही देशाची संपत्ती आहे. हा आमच्या नेत्यांचा बहुमान आहे!’ही बातमी कळल्यावर खाणीला भेट देण्यासाठी आलेले स्थानिक लोकप्रतिनिधी उ टिंट सोए म्हणाले, ‘ आमचे सरकार सत्तेवर असताना हा बहुमोल पाचूचा दगड मिळावा हे आम्हा नागरिकांचे. आमच्या सरकारचे व आमच्या पक्षाचे भाग्यच म्हणावे लागेल.’पृथ्वीच्या पोटात मिळणारे असे मौल्यवान दगड ही निसर्गाची किमया मानली जाते. अशीच किमया म्हणून अलीकडेच फिलिपिन्समध्ये सापडलेल्या ३४ किनो वजनाच्या मोत्याने जगाचे लक्ष वेधून घेतले होते. १० वर्षांपूर्वी सापडलेला तो मोती गेल्या आॅगस्टमध्ये प्रथमच जाहीरपणे प्रदर्शित करण्यात आला होता. आता अचंबा म्हणून या काचिन पाचूने त्या मोत्यालाही मागे टाकले आहे. (वृत्तसंस्था)>दारिद्र्य, विषमतेची खाणसाडेपाच कोटी लोकसंख्येच्या म्यानमारमध्ये जगातील सर्वोत्तम दर्जाचे बहुतांश पाचूचे दगड (जेटाईट) सापडतात. सुमारे ५७ अब्ज डॉलर एवढे या देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) असून निम्मी अर्थव्यवस्था मौल्यवान खड्यांच्या खाणींवर अवलंबून आहे. मात्र येथील जनता दारिद्र्य आणि आर्थिक विषमतेने ग्रासलेली असून, मानवी विकास निर्देशांकात म्यानमारचा क्रमांक जगातील १८७ देशांमध्ये १५० लागतो.