शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शांततेने सत्ता हस्तांतरणाचे म्यानमार सरकारचे आश्वासन

By admin | Updated: November 12, 2015 00:05 IST

गेल्या रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकशाहीवादी नेत्या आँग सॅन सू की यांच्या पक्षाने निर्विवाद यश मिळविल्यानंतर लष्कर समर्थित विद्यमान सरकारने शांततेने सत्ता हस्तांतरण करण्याचे

यांगून : गेल्या रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकशाहीवादी नेत्या आँग सॅन सू की यांच्या पक्षाने निर्विवाद यश मिळविल्यानंतर लष्कर समर्थित विद्यमान सरकारने शांततेने सत्ता हस्तांतरण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या देशात सू की यांचे सरकार येणे ही अटळ बाब ठरली आहे.अध्यक्ष थिन सेन यांनी यासंदर्भात लिहिलेले एक पत्र माहितीमंत्री ये हुतूत यांनी सू की यांना दिले आहे. जनतेने दिलेल्या कौलाचा आदर करीत सत्ता हस्तांतरण केले जाईल, असे आश्वासन अध्यक्षांनी या पत्रात दिले आहे. या पत्रातच अध्यक्षांनी सू की यांचे अभिनंदन केले आहे. मात्र, स्वत: अध्यक्षांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.यापूर्वी १९९० मध्येही सू की यांच्या पक्षानेच विजय मिळविला होता; पण त्यावेळी लष्कराने तो निकाल मान्य केला नव्हता. आताही तसेच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना आता सत्ता हस्तांतरणाचे आश्वासन सरकारने दिले आहे.म्यानमारमधील निवडणुकीत घवघवीत यश मिळविल्यानंतर येथील लोकशाहीसमर्थक नेत्या आँग सॅन सू की यांनी देशाचे अध्यक्ष आणि शक्तिशाली लष्कर यांच्याशी राष्ट्रीय मनोमिलनाचे आवाहन तत्पूर्वी केले होते. रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सू की यांच्यात नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी या पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले असून संसदेतील कनिष्ठ सभागृहातील आतापर्यंत घोषित निकालांपैकी ९० टक्के जागा जिंकल्या आहेत.मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी आतापर्यंत नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी या पक्षाला विजयी घोषित केलेले नाही; पण जाहीर झालेले निकाल पाहता सू की यांची राजवट अटळ आहे. या देशात गेल्या ५० वर्षांपासून लष्कर किंवा त्यांच्या सहकारी पक्षांची सत्ता राहिलेली आहे. (वृत्तसंस्था)