शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोर्टापुढे हजर न झाल्याने मुशर्रफ यांना निवडणूकबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 05:51 IST

गेली दोन वर्षे दुबईत वास्तव्य करणारे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ कोर्टापुढे हजर न झाल्याने पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने संसदेची १२ जुलै रोजी होणारी निवडणूक लढण्यास त्यांना आधी दिलेली मुभा गुरुवारी रद्द केली.

इस्लामाबाद - गेली दोन वर्षे दुबईत वास्तव्य करणारे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ कोर्टापुढे हजर न झाल्याने पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने संसदेची १२ जुलै रोजी होणारी निवडणूक लढण्यास त्यांना आधी दिलेली मुभा गुरुवारी रद्द केली.उच्च न्यायालयाने मुशर्रफ यांना २०१३ मध्ये निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले. त्याविरुद्ध मुशर्रफ यांचे अपील सर्वोच्च न्यायालयात आहे. संसदेची निवडणूक जाहीर झाल्यावर त्यांच्या वकिलांनी बंदी तात्पुरती उठवून त्यांना निवडणूक लढवू द्यावी, अशी विनंती केली. सरन्यायाधीश मियाँ सादिब निसार यांच्या खंडपीठाने अशी अंतरिम मुभा दिली होती. ते आल्यास त्यांना अटक होणार नाही ही खात्रीही दिली. पण ते आले नाहीत. त्यांनी आणखी वेळ मागितली. पण आदेशानुसार ते न आल्यामुळे निवडणूक लढविण्यास मुभा देणारा अंतरिम आदेश रद्द केला. यामुळे मुशर्रफ यांचा उमेदवारी अर्ज आता बाद होईल. (वृत्तसंस्था)तिन्ही खटल्यांत फरारमाजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येचा खटला, राष्ट्राध्यक्ष असताना राज्यघटना गुंडाळून ठेवून देशात आणीबाणी लागू करणे व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना नजरकैदेत टाकणे याबद्दलचा देशद्रोहाचा खटला आणि लाहोरच्या लाल मशिदीच्या इमामाच्या खुनाचा खटला अशा तीन खटल्यांमध्ये मुशर्रफ आरोपी आहेत.या तिन्ही खटल्यांमध्ये वॉरन्ट काढूनही हजर न झाल्याने त्यांना फरार घोषित केले गेले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानCourtन्यायालय