शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
2
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
3
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
4
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेस; पाकिस्तानला लागणार मिरची..!
5
सरकार बदलणार MRP चा फॉर्म्युला; वस्तूंच्या किंमती कमी होणार की महागणार? ग्राहकांवर होणार परिणाम
6
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
7
Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...
8
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
9
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!
10
WI vs AUS: अब्रूचं खोबरं! कॅरेबियन संघ २७ धावांवर ऑल आउट! ७ फलंदाजांच्या पदरी पडला भोपळा
11
Video: पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
12
मुंबई: घरातील सगळे झोपले अन् वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने आयुष्य संपवले, साडीनेच घेतला...
13
BSE Bomb Threat: "बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत दुपारी ३ वाजता बॉम्ब स्फोट होणार" धमकीचा ईमेल!
14
१३८ दिवस शनि वक्री: ५ राशींवर शनिची वक्र दृष्टी कायम, ‘हे’ रामबाण उपाय कराच; शनि शुभ करेल!
15
संतापजनक! ६ मुलं तरी मुखाग्नीसाठी ६ तास थांबले, अंत्यसंस्कारावेळी संपत्तीवरुन स्मशानभूमीत भिडले
16
हत्या की अपघात? रस्त्यावर स्कूटी, शेतात चप्पल... बेपत्ता बँक मॅनेजरचा विहिरीत सापडला मृतदेह
17
जम्मू-काश्मीरमधील दोडामध्ये भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेले वाहन दरीत कोसळले; सात जणांचा मृत्यू
18
Bread Gulabjam: उरलेल्या ब्रेडच्या स्लाईजपासून १० मिनिटात करा मऊ रसरशीत गुलाबजाम! 
19
"मी एक मोठा सिनेमा करतोय...भाऊ कदम अन् 'हा' अभिनेता दिसणार"; निलेश साबळेचा खुलासा
20
कुतुहलापोटी रेल्वे इंजिन बघायला वर चढला, पण हाय पॉवर केबलचा करंट जीवावर बेतला; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

तेलाच्या घसरत्या किंंमतीचा आखाती देशांमधल्या भारतीयांना सर्वाधिक फटका

By admin | Updated: January 22, 2016 16:15 IST

तेलाच्या घसरत्या किंमतींचा आखाती देशातील अर्थव्यवस्थांना चांगलाच फटका बसला असून, त्याचा सर्वाधिक परिणाम आखाती देशांमध्ये रहाणा-या भारतीयांवर होत आहे.

ऑनलाइन लोकमत 

चेन्नई, दि. २२ -  जागतिक तेल बाजारातील तेलाच्या घसरत्या किंमतींचा आखाती देशातील अर्थव्यवस्थांना चांगलाच फटका बसला असून, त्याचा सर्वाधिक परिणाम आखाती देशांमध्ये रहाणा-या भारतीयांवर होत आहे. तेलाच्या घसरलेल्या किंमतींमुळे उत्पन्न वाढवण्यासाठी आखाती देशांनी कठोर आर्थिक उपायोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यात परदेशी नागरीकांच्या उत्पनावर कर आकारण्याची योजना आहे. त्याचा सर्वाधिक फटका भारतीयांना बसेल. कारण बहुसंख्य भारतीय मोठया संख्येने आखाती देशांमध्ये स्थायिक आहेत. 
 
 
संभाव्य परिणामांचा विचार करुन तिथे रहाणा-या भारतीय नोकरदार, अधिका-यांनी आपल्या कुटुंबाला भारतात पाठवण्यास सुरुवात केली आहे. विशेषकरुन ओमानने परदेशी नागरीकांच्या उत्पनावर परिणाम करणा-या निर्णयाची अंमलबजावणी सुरु केली आहे.
 
दुबई वगळता आखाती देशांची अर्थव्यवस्था पूर्णपणे तेलावर अवलंबून आहे. तेल दराच्या घसरणीमुळे तिथे नोकरकपात सुरु असून, अनेक कंपन्यांनी वेतनवाढ रोखली आहे. अनेक मंजूर केलेले प्रकल्पही रद्द केले आहेत. 
 
जीसीसी देशाच्या संघटनेने नवीन कर लावले असून, देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. जीसीसी देशांनी सहा महिन्यापूर्वी परदेशी नागरीकांच्या उत्पनावर इन्कम टॅक्स सुरु केला तर, यूएईची व्हॅट लागू करण्याची प्रक्रिया सुरु आहे. घर भाडयाचे प्रचंड वाढलेले दर आणि मुलांच्या शाळा प्रवेशामध्ये येणा-या अडचणी हे भारतीय कुटुंब माघारी येण्यामागची प्रमुख कारणे आहेत. 
 
आखातील देशातील अनेक कंपन्या नोकर कपात किंवा वेतन कपात करत आहेत असे सरकारी अधिका-याने सांगितले. आम्हा मध्यमवर्गीयांची इथे फार दयनीय अवस्था झाली आहे. ज्या कंपन्या आपल्या कर्मचा-यांच्या निवासाची व्यवस्था करत नाहीत त्यांना घरभाडयापोटी प्रचंड रक्कम खर्च करावी लागत असून, संपूर्ण कुटुंबाला सोबत ठेवणे कठिण झाले आहे असे इथे रहाणा-या एका भारतीयाने सांगितले. 
 
 - संयुक्त अरब अमिरातीची एकूण लोकसंख्या सुमारे ९४ लाख आहे, ज्यामध्ये भारतीयांचे प्रमाण २६ लाख म्हणजे तब्बल २७ टक्के आहे.
 
 - भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश व श्रीलंका या देशातील नागरिकांचे अरब अमिरातीचे प्रमाण बघितले तर ते तब्बल ५५ टक्के आहे.
-  संयुक्त अरब अमिरातीतील मूळच्या नागरिकांची संख्या ११ लाखाच्या आसपास असून एकूण लोकसंख्येच्या ती ११ टक्के एवढी आहे. (संदर्भ bq-magazine.com)
- विदेशांमध्ये वास्तव्यास असलेले अनिवासी भारतीय, दरवर्षी सुमारे ७० अब्ज डॉलर्स भारतात पाठवतात. यामध्ये संयुक्त अरब अमिरातीतून धाडण्यात आलेले पैसे सुमारे १५ अब्ज डॉलर्स आहेत.