शहरं
Join us  
Trending Stories
1
अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर
2
आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
3
‘ॲापरेशन सिंदूर’नंतर रॉचे अधिकारी मराठवाड्यात; केंद्र सरकारकडून अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू
4
नाव बसवा राजू... इनाम ५ कोटी... १५ नावांची ओळख अन् बनला सर्वोच्च नेता
5
‘पायरसी’मुळे सिनेमाला २२,४०० कोटींचा ‘झटका’; फटका कुणाला?
6
पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी 
7
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
8
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
9
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
10
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
11
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
12
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
13
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
14
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
15
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
16
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
17
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
18
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
19
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
20
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत

मोदींचा इराण दौरा ठरणार 'गेमचेंजर', चीन, पाकिस्तानला ठोस उत्तर

By admin | Updated: May 23, 2016 14:41 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या इराण दौ-यावर असून, त्यांच्या या दौ-यामध्ये छाबहार बंदर करार महत्वाचा ठरणार आहे.

ऑनलाइन लोकमत 

तेहरान, दि. २३ - पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या इराण दौ-यावर असून, त्यांच्या या दौ-यामध्ये छाबहार  बंदर करार महत्वाचा ठरणार आहे. या करारामुळे पाकिस्तानच्या सागरी हद्दीचा वापर न करता अफगाणिस्तानला थेट पोहोचता येणार असून, मध्य आशियाचा मार्ग भारतासाठी खुला होणार आहे. 
 
पंतप्रधान मोदींच्या इराण दौ-यातील दहा महत्वाचे मुद्दे 
 
१) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांच्यामध्ये सोमवारी छाबहार  बंदर विकसित करण्याचा ऐतिहासिक करार झाला. इराणच्या दक्षिणेला गल्फ ऑफ ओमानमधील छाबहार महत्वाचे बंदर आहे. भारतासाठी रणनितीक दृष्टीकोनातून हे महत्वाचे बंदर आहे. भारत आणि इराणमध्ये एकूण १२ करार झाले. 
 
२) या बंदरामुळे अफगाणिस्तानात आणि मध्य आशियात जाण्यासाठी पाकिस्तानच्या सागरी हद्दीतून जाण्याची गरज उरणार नाही. रस्ते आणि समुद्र मार्गे इराणहून अफगाणिस्तानात जात येईल.
 
३) छाबहार बंदराच्या विकासासाठी भारत मदत करणार असून, भारत या बंदराच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यात वीस कोटी डॉलरची गुंतवणूक करणार आहे. 
 
४) दुस-या टप्प्यात  छाबहार आणि झाहीदानमध्ये ५०० कि.मी. रेल्वे जाळे उभारण्याची भारताची योजना आहे. 
 
५) पाकिस्तानने आपल्या हद्दीतून अफगाणिस्तानला मालवाहतूक करण्याची भारताला परवानगी दिलेली नाही. 
 
६) चीन आणि पाकिस्तानमधील वाढत्या रणनितीक भागीदारीच्या दृष्टीनेही छाबहार बंदर करार महत्वाचा आहे. चीन पाकिस्तानमधील ग्वादर बंदर विकसित करत आहे. पाकिस्तानातील ग्वादर बंदर छाबहारपासून फक्त ७२ कि.मी. अंतरावर आहे. 
 
७) आंतरराष्ट्रीय समुदायाने चार महिन्यांपूर्वी इराणवरील आर्थिक निर्बंध हटवल्यानंतर मोदी इराण दौ-यावर गेले आहेत. मागच्या पंधरा वर्षात इराण दौ-यावर जाणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. 
 
८) व्दिपक्षीय व्यापार, ऊर्जा सुरक्षा आणि दळणवळण हे मोदींच्या दौ-यातील महत्वाचे उद्देश आहेत, ते इराणमध्ये भारतीय सांस्कृतिक महोत्वसाचे उदघाटन करणार आहेत. 
 
९) भारत इराणकडून तेल आयात दुपट्टीने वाढवण्याचा विचार करत आहे. 
 
१०) मोदींच्या दौ-यापूर्वी भारताने इराणचे बाकी असलेले ६.४ अब्ज डॉलरचे तेल बिल अदा केले.