वॉशिंग्टन : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यात २७ सप्टेंबरला फेसबुक हेडक्वॉर्टरला भेट देणार आहेत. फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी याबाबत पोस्ट करून माहिती दिली आहे.फेसबुक हेडक्वॉर्टरला भेट देऊन नरेंद्र मोदी हे तेथील कर्मचाऱ्यांशी संवादही साधणार आहेत. झुकेरबर्ग म्हणतात की, मोदी हे फेसबुक हेडक्वॉर्टरला भेट देणार असल्याने आपण अतिशय उत्साही आहोत. या चर्चेत मोदी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरेही देणार आहेत. आर्थिक आणि सामाजिक आव्हाने पेलण्यासाठी काय करता येईल, यावरही चर्चा करण्यात येणार आहे. तथापि, मोदींना प्रश्न विचारण्यासाठी झुकेरबर्ग यांनी फेसबुक पेजवरून सूचनाही मागितल्या आहेत. (वृत्तसंस्था)
फेसबुक कार्यालयास मोदी देणार भेट
By admin | Updated: September 14, 2015 01:10 IST