शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मोदी अमेरिकेत पोहोचले ! उद्या घेणार ट्रम्प यांची भेट

By admin | Updated: June 25, 2017 08:48 IST

अमेरिका दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले आहेत. मोदी आज विविध कार्यक्रमात सहभाग घेणार असून, उद्या मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती

ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 25 -   बहुचर्चित अमेरिका दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र  वॉशिंग्टनमध्ये  दाखल झाले आहेत. मोदी आज विविध कार्यक्रमात सहभाग घेणार असून, उद्या मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, ट्रम्प यांनी मोदींच्या स्वागतासाठी ट्विट केले आहे. ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये मोदींचा उल्लेख "खरा मित्र" असा केला आहे.
पोर्तुगालचा दौरा आटोपल्यावर भारतीय वेळेनुसार आज सकाळी मोदी वॉशिंग्टनमध्ये पोहोचले. तेथे अमेरिकेतील भारताचे राजदूत नवतेज सरना आणि त्यांची पत्नी अविना सरना तसेच अमेरिकेच्या भारतातील राजदूत मेरी के लॉस कार्लसन यांनी मोदींचे स्वागत केले. मोदींच्या स्वागतासाठी जॉइंट बेस अँड्र्यूज विमानतळावर भारतीय समुदायाचे नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.  2014 साली भारताच्या पंतप्रधानपदाची सूत्रे सांभाळल्यापासून मोदींचा हा पाचवा अमेरिका दौरा आहे. 
सोमवारी मोदी व ट्रम्प यांची भेट होणार असून, त्यांच्यात तब्बल पाच तास चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येते. मोदी यांच्या सन्मानार्थ ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये सोमवारी रात्री भोजन समारंभ आयोजित केला आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर परदेशी पाहुण्यासाठी व्हाइट हाउसमध्ये आयोजित करण्यात येणारा हा पहिला भोजन समारंभ आहे. एच१बी व्हिसाचा विषय चर्चेचा भाग नसेल, असे व्हाइट हाउसने स्पष्ट केले आहे. 
दोन्ही नेते दहशतवाद, भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आधुनिकीकरण व त्यासाठी अमेरिकेची मदत, संबंधांना बळकटी, व्यापारात वाढ यावर चर्चा करतील. त्याची माहिती निवेदनाद्वारे सर्वांना दिली जाणार आहे. ट्रम्प व मोदी माध्यमांच्या प्रतिनिधींनाही भेटणार आहेत. त्यानंतर प्रतिनिधी पातळीवरही दोन देशांमध्ये चर्चा होणार आहे आणि अमेरिकन बड्या कंपन्यांच्या सीईओबरोबरही मोदी यांची भेट ठरली आहे. 
अमेरिका दौऱ्याचा प्रमुख हेतू दोन देशांमधील संबंध बळकट करणे हा असून, त्या संबंधांचा फायदा भारताला आणि जगालाही होईल, असे मोदी यांनी दौरा सुरू करण्यापूर्वी टिष्ट्वटद्वारे नमूद केले आहे.