शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नऊ निष्पापांचा बळी घेऊन म्युनिक हल्लेखोराची आत्महत्या

By admin | Updated: July 24, 2016 02:14 IST

म्युनिक शहरातील शॉपिंग सेंटरवर शुक्रवारी गोळीबार करून नऊ जणांचा बळी घेत १६ जणांना जखमी करणारा हल्लेखोर अवघा १८ वर्षांचा मुलगा होता आणि हल्ल्यानंतर त्याने आत्महत्या

म्युनिक : म्युनिक शहरातील शॉपिंग सेंटरवर शुक्रवारी गोळीबार करून नऊ जणांचा बळी घेत १६ जणांना जखमी करणारा हल्लेखोर अवघा १८ वर्षांचा मुलगा होता आणि हल्ल्यानंतर त्याने आत्महत्या केली. या जर्मन-इराणियन मुलगा निराशेने ग्रासला होता, असे पोलिसांनी शनिवारी सांगितले. त्याने एकट्याने हल्ला केला. त्याचे कोणीही साथीदार नव्हते, असे स्पष्ट झाले आहे. युरोपमध्ये गेल्या आठ दिवसांत झालेला हा तिसरा हल्ला आहे. म्युनिकमधील या हल्ल्याचे धक्के संपूर्ण युरोपात जाणवले. येथील सर्वाधिक खपाच्या बिल्ड या वृत्तपत्राने म्युनिचमध्ये रक्तपात या मथळ््याखाली हल्ल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. हल्ला करणारा मुलगा म्युनिकमधीलच रहिवासी होता. त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती, असे पोलिसांनी सांगितले. या हल्ल्याचा हेतू स्पष्ट होऊ शकला नाही, असेही ते म्हणाले. हॅण्डगन घेऊन आलेल्या या मुलाने आधी मॅकडोनाल्ड उपाहारगृहात अंदाधुंद गोळीबार केला. त्यानंतर तो मॉलमध्ये शिरला आणि तेथेही गोळीबार केला. गस्ती पथकातील एका पोलिसाने त्याला गोळी मारून जखमी केले. मात्र, तो मॉलमधून निसटण्यात यशस्वी झाला. आम्हाला एकाचा मृतदेह मिळाला असून त्याने स्वत:ला ठार केले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या एका व्हीडीओत काळ््या पेहरावातील एक बंदुकधारी लोकांवर गोळ््या झाडत रस्त्यावरून जाताना व लोक ओरडत सैरावैरा पळताना दिसतात. हल्लेखोर वाहनतळाच्या छतावरून जवळच्या बाल्कनीतील व्यक्तीशी वाद घालताना एका व्हिडीओत दिसतो. बाल्कनीतील व्यक्तीने परदेशी लोकांबाबत आक्षेपार्ह भाषा वापरल्यानंतर हल्लेखोर मुलगा, मी जर्मन आहे, येथे जन्मलो आहे, असे त्याला सांगताना यात दिसतो. या हल्ल्यात तीन जण सहभागी आहेत, असे पोलिसांना आधी वाटत होते. (वृत्तसंस्था)सर्व भारतीय सुरक्षितजर्मनीतील हल्ल्यात बळी पडलेल्यांत एकही भारतीय नसल्याचे भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी शनिवारी येथे सांगितले. जर्मनीतील भारतीय राजदूत गुरजितसिंग यांच्याशी मी संपर्क साधला होता. त्यांनीच ही माहिती दिली, असे टिष्ट्वट स्वराज यांनी केले. गोळीबाराच्या घटनेनंतर म्युनिचमधील भारतीय वकिलातीने तेथील भारतीयांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला.