शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मिनी स्कर्ट घातला म्हणून "त्या" तरूणीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 14:41 IST

सौदी अरेबियामध्ये मिनी स्कर्ट घालून फिरणं एका तरूणीला चांगलंच महागात पडलं आहे. मिनी स्कर्ट घालून फिरल्यामुळे येथील पोलिसांनी तिला थेट अटक केली आहे.

ऑनलाइन लोकमत
रियाध, दि. 18- सौदी अरेबियामध्ये मिनी स्कर्ट घालून फिरणं एका तरूणीला चांगलंच महागात पडलं आहे. मिनी स्कर्ट घालून फिरल्यामुळे येथील पोलिसांनी तिला थेट अटक केली आहे. इस्लामिक ड्रेस कोडचं उल्लंघन केल्यामुळे तिला अटक करण्यात आल्याची माहिती आहे.  या तरूणीला अटक केल्याने सोशल मीडियावर सौदी सरकारवर जोरदार टीका होत आहे. 
 
"खुलूद" नावाची ही तरूणी मिनी स्कर्ट आणि क्रॉप टॉप घालून सौदीच्या रस्त्यावर फिरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सौदीच्या राजधानीपासून काही किलोमीटर दूर असणाऱ्या एका प्राचीन किल्ल्यावर ती क्रॉप टॉप आणि मिनी स्कर्ट घालून फिरत होती. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सौदीतील स्थानिकांनी त्या तरूणीच्या या वर्तनाला विरोध करायला सुरूवात केली. 
 
मिनी स्कर्ट घालून फिरणाऱ्या त्या तरूणीचा व्हिडिओ सुरूवातील स्नॅपचॅटवर पोस्ट करण्यात आला होता. ती मुलगी सौदीतील ऑशेगर गावात असलेल्या एका किल्ल्यावर फिरत होती. हे गाव राजधानी रियाध पासून 200 किलोमीटर अंतरावर आहे. सौदी मीडियाने सोमवारी ही बातमी प्रसारीत केली होती. तरूणी फिरत असलेला गाव पाश्चिमात्य संस्कृतीच्या विरोधात असून तेथे पारंपारिक पद्धती अजूनही वापरल्या जातात. सौदी प्रशासनाने या तरूणीच्या विरोधात कारवाई करण्याचा इशारा दिला होता. 
 
सौदीमध्ये हिजाब, आयबा परिधान करण्याची महिलांना सक्ती आहे. हे नियम मोडणाऱ्या महिलेला शिक्षा दिली जाते. इथे महिलांसाठी एक ड्रेसकोड निश्चित आहे.  सौदीतील महिला लांब आणि ढीले तसंच पूर्ण शरीर झाकणारे कपडे घालतात. तसा नियमच करण्यात आला आहे.