आबूधाबी : ब्राझीलच्या १७ वर्षीय मॉडेल तरुणीला आक्षेपार्ह छायाचित्रे पाठवल्याच्या आरोपावरून दुबई येथे अटक करण्यात आलेल्या बॉलीवूडचा गायक मिका सिंगला गुरुवारी रात्री चौकशीनंतर सोडून देण्यात आले आहे.युएईतील भारतीय राजदूत नवदीपसिंग सूरी यांनी ही माहिती दिली. दुबईत अटक करून मिका सिंगला आबूधाबीला नेण्यात आले होते. मिका सिंगला युएईतील कोर्टात हजर रहावे लागणार आहे, असेहीसूरी यांनी प्रसारमाध्यमांना कळवले आहे.मिका सिंग दुबईत एका कार्यक्रमासाठी तो गेला होता. आपल्याला मिकाने आक्षेपार्ह फोटो पाठविल्याची तक्रार एका १७ वर्षीय मॉडेलने मुरक्काबात पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार गुुरुवारी पहाटे ३ च्या सुमारास मिका सिंग याला अटक करण्यात होती. (वृत्तसंस्था)
मिका सिंगची चौकशीनंतर सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 04:49 IST