शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘एमएच१७’वर धडकल्या होत्या अनेक जोरकस वस्तू

By admin | Updated: September 10, 2014 05:55 IST

अनेक जोरकस वस्तू धडकल्यामुळे एमएच - १७ या मलेशियन विमानाचा आकाशातच स्फोट झाला होता,

द हेग (नेदरलॅण्ड) : अनेक जोरकस वस्तू धडकल्यामुळे एमएच - १७ या मलेशियन विमानाचा आकाशातच स्फोट झाला होता, अशी माहिती युक्रेनच्या पूर्व भागात झालेल्या या भीषण दुर्घटनेवरील प्राथमिक अहवालामध्ये देण्यात आली आहे. या दुर्घटनेत २९८ जणांचा बळी गेला होता. नेदरलॅण्ड सुरक्षा मंडळाने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात म्हटले आहे की, बाहेरील बाजूने वेगवान वस्तूंच्या माऱ्यामुळे मलेशियन विमानाचे हवेतच तुकडे तुकडे झाले होते. अहवालाच्या निष्कर्षावरून मलेशियन विमानास क्षेपणास्त्राद्वारे लक्ष्य बनविण्यात आल्याच्या दाव्याला बळ मिळते. हे विमान जुलैमध्ये अ‍ॅमस्टरडॅम येथून क्वालालम्पूरला जात असताना युक्रेनच्या पूर्व भागात कोसळले होते. हे विमान तांत्रिक समस्या किंवा वैमानिकांच्या चुकीमुळे दुर्घटनाग्रस्त झाल्याचे कोणतेही संकेत मिळत नाहीत, असे या अहवालात म्हटले आहे. युक्रेन आणि पाश्चात्य देशांनी रशिया समर्थक बंडखोरांनी जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या बीयूके क्षेपणास्त्राद्वारे हे विमान पाडल्याचा आरोप केला होता. रशियाने बंडखोरांना ही क्षेपणास्त्रे पुरविली असल्याचाही त्यांचा आरोप होता, तर रशियाने हे आरोप फेटाळून लावत युक्रेन सरकारनेच हे विमान पाडले असल्याचा प्रत्यारोप केला होता. मलेशियन एअरलाईन्सचे विमान एमएच ३७० मार्चमध्ये गूढरीत्या बेपत्ता झाल्यानंतर एमएच १७ विमानाला झालेल्या अपघाताच्या रूपाने या एअरलाईन्सला दुसरा मोठा धक्का बसला होता, तसेच संपूर्ण जगाचे लक्ष पूर्व युक्रेनमधील रक्तरंजित संघर्षाकडे वेधले गेले होते. दुर्घटनाग्रस्त विमानातील बहुतांश प्रवासी नेदरलॅण्डचे नागरिक होते. (वृत्तसंस्था)