शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

४३ विद्यार्थ्यांच्या हत्येनंतर मेक्सिकोत आंदोलन...!

By admin | Updated: November 10, 2014 03:20 IST

मेक्सिकोतील टोळीने ४३ विद्यार्थ्यांची हत्या केल्याचे उघडकीस आल्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने अनेक वाहनांना आग लावली

चिल्पान्सिंगो (मेक्सिको) : मेक्सिकोतील टोळीने ४३ विद्यार्थ्यांची हत्या केल्याचे उघडकीस आल्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने अनेक वाहनांना आग लावली असून, सरकारी मुख्यालयावर बॉम्ब फेकले आहेत. चिल्पान्सिंगो येथील ग्युएरोरो सरकारच्या मुख्य कार्यालयावर दगडफेक करण्यात ३०० पेक्षा अधिक मुखवटे घातलेले विद्यार्थी सहभागी होते. या दगडफेकीत कार्यालयाच्या काचा फुटल्या आहेत. दगडफेक करणाऱ्या एका विद्यार्थ्याने आमचे कॉम्रेड आम्हाला जिवंत पाहायचे आहेत, असे सांगितले. २६ सप्टेंबर रोजी ग्युएरेरो शहरात पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या बसवर गोळीबार केला होता. त्यात ६ विद्यार्थी मरण पावले होते. बाकीचे ४३ विद्यार्थी या घटनेनंतर बेपत्ता झाले होते. अ‍ॅटर्नी जनरल जेसस म्युरीलो यांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना आपल्या ताब्यात दिल्याचे टोळीच्या तीन सदस्यांनी मान्य केले आहे. या मुलांची हत्या करून त्यांना जाळून टाकण्यात आल्याची चित्रफीत जारी करण्यात आली आहे; पण मुलांचे पालक व सहविद्यार्थी त्यांचा मृत्यू झाला हे मान्य करण्यास तयार नाहीत. जोपर्यंत मृतदेहांच्या अवशेषांची डीएनए चाचणी होत नाही, तोपर्यंत कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवणार नाही, असे आंदोलनातील लोकांचे म्हणणे आहे.