शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

भारताला मेक्सिकोचा पाठिंबा

By admin | Updated: June 10, 2016 04:05 IST

आण्विक पुरवठादार गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळविण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना मेक्सिकोने गुरुवारी पाठिंबा दिला.

मेक्सिको सिटी : आण्विक पुरवठादार गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळविण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना मेक्सिकोने गुरुवारी पाठिंबा दिला. ४८ देश सदस्य असलेल्या एनएसजीचे खुले अधिवेशन होत असून, त्या पार्श्वभूमीवर मेक्सिकोचा पाठिंबा महत्त्वाचा आहे. या गटातील सदस्य देश आपापसांत अणू तंत्रज्ञानाचा व्यापार व निर्यात करू शकतात. मेक्सिकोचे अध्यक्ष एन्रिक पेना निएतो यांनी एनएसजीचे सदस्यत्व मिळण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. त्या आधी मोदी आणि निएतो यांच्यामध्ये द्विपक्षीय आणि जागतिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. सदस्यत्व मिळण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना मेक्सिकोचा सकारात्मक आणि विधायक पाठिंबा असल्याचे निएतो यांनी मोदी यांच्यासोबत घेतलेल्या परिषदेत सांगितले. मोदी यांनी मेक्सिकोने पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षेमध्ये मेक्सिको महत्त्वाचा भागीदार असल्याचे म्हटले. केवळ खरेदी करणारे आणि विकणारे देश एवढ्या नात्यापलीकडे जाऊन आम्ही दीर्घकाळची भागीदारी निर्माण करण्याचे बघत आहोत, असे मोदी या वेळी म्हणाले. मोदी आणि निएतो यांच्यातील भेटीमध्ये व्यापार, गुंतवणूक, माहिती तंत्रज्ञान, हवामान बदल आणि ऊर्जा या क्षेत्रांसह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांत व्यापक सहकार्य करण्यावर चर्चा झाली. मेक्सिको एनएसजीचा महत्त्वाचा सदस्य असल्यामुळे त्याने भारताला दिलेल्या पाठिंब्याचे महत्त्व आहे. भारताच्या या प्रयत्नांना सदस्य देश स्वित्झर्लंड व अमेरिकेनेही पाठिंबा दिला आहे.भारताच्या एनएसजीचे सदस्यत्व मिळविण्यासाठीच्या प्रयत्नांना चीन विरोध करीत आहे. अण्वस्त्रे प्रसारबंदी करारावर (एनपीटी) भारताने स्वाक्षरी केली नसल्यामुळे भारताला सदस्यत्व देऊ नये, अशी चीनची भूमिका आहे. मंगळवारी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या भेटीमध्ये हा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत होता. अण्वस्त्रे प्रसारासाठीचा भारताचा जो प्रवास आहे, त्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि एनएसजीच्या इतर सदस्यांनी त्याच्या सदस्यत्वासाठी पाठिंबा दिला आहे. एनएसजीचे कामकाज हे एकमताने चालते. एकाही सदस्य देशाने विरोध केला, तर भारताचे प्रयत्न अपयशी ठरतील. सदस्यत्वासाठी भारत गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करीत असून, त्यासाठीचा औपचारिक अर्ज त्याने गेल्या १२ मार्च रोजी दिला. (वृत्तसंस्था)>रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी भोजनविशेष आदरतिथ्य म्हणून निएतो हे स्वत: कार चालवत, मोदी यांना भोजनासाठी रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेले, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी टिष्ट्वटरद्वारे सांगितले. त्यांनी त्यासोबत फोटोही पोस्ट केला. त्यात निएतो कार चालवित असून, त्यांच्या शेजारी मोदी बसलेले दिसतात. ‘क्विंटोनिल’ नावाच्या या रेस्टॉरंटमध्ये त्यांनी शाकाहारी जेवण घेतले.मोदी मायदेशी रवानामेक्सिकोच्या छोट्याशा भेटीनंतर पाच देशांचा दौरा आटोपून मोदी गुरुवारी मायदेशी रवाना झाले. या दौऱ्यात ते अमेरिका, कतार, स्वित्झर्लंड आणि अफगाणिस्तानलाही गेले होते.मेक्सिकोचे आभार‘भारत-मेक्सिको यांच्या मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाला आणि या नात्याचा आमच्या देशाच्या लोकांना आणि संपूर्ण जगाला लाभ होईल’, असे मोदी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले. मोदींचा दौरा ४ जून रोजी सुरू झाला होता.