शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: खराब रस्त्यानं नागरिक त्रस्त; महापौराला गाडीला बांधून फरफटवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 11:00 IST

रस्ते दुरुस्ती करण्याचं आश्वासन पूर्ण न केल्यानं नागरिक संतप्त

मेक्सिको: महापौराला गाडीला बांधून फरफटवल्याप्रकरणी पोलिसांनी अकरा जणांना अटक केली आहे. रस्ते खराब असल्यानं ग्रामस्थांनी महापौरांना त्यांच्या कार्यालयातून बाहेर काढून एका पिकअप ट्रकला बांधलं आणि रस्त्यावरुन फरफटत नेलं. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत महापौराची सुटका केली. मेक्सिकोमध्ये हा प्रकार घडला.महापौर जॉर्ज लुईस इस्कॅन्डॉन हेर्नानडेझ यांनी ग्रामस्थांना रस्ते दुरुस्त करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र वारंवार वचनाची आठवण करुन देऊनही त्यांनी रस्ते दुरुस्त केले नाहीत. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी हेर्नानडेझ यांना कार्यालयातून बाहेर काढलं. यानंतर त्यांना पिकअप ट्रकला बांधून फरफटवण्यात आलं. या घटनेनंतर परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. याआधीही आश्वासनं पूर्ण न केल्यानं हेर्नानडेझ यांच्यावर शेतकऱ्यांनी हल्ला केला होता.  हेर्नानडेझ यांच्यावरील हल्ल्याची दृश्यं कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. त्यामध्ये काही जण त्यांना इमारतीमधून बाहेर खेचून आणून गाडीला बांधताना दिसत आहेत. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीतही कैद झाला आहे. त्यामध्ये गाडीच्या मागे फरफटत जाणारे हेर्नानडेझ दिसत आहेत. या प्रकरणी आपण अपहरण आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणार असल्याचं हेर्नानडेझ यांनी सांगितलं.  मेक्सिकोमधील महापौर आणि राजकीय नेत्यांवर याआधी अनेकदा हल्ले झाले आहेत.  बहुतेकदा हे हल्ले ड्रग्स माफियांकडून केले गेले आहेत. मात्र आता आश्वासनं पूर्ण न करणाऱ्या लोकप्रतिनिधींवरदेखील हल्ले होऊ लागले आहेत. संतप्त स्थानिकांकडून लोकप्रतिनिधींना लक्ष्य करण्यात येत आहे.