शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

130 बायका आणि 203 मुलं असलेल्या मौलवीचं निधन

By admin | Updated: January 31, 2017 20:22 IST

130 बायका आणि 203 मुलं असलेल्या मौलवी मोहम्मद बेलो अबूबकर यांचं वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं

ऑनलाइन लोकमत
अबूजा, दि. 31 - नायजेरियातील मौलवी मोहम्मद बेलो अबूबकर यांचं वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं. एका खास कारणासाठी त्यांचं नाव नेहमी चर्चेत होतं. त्यांनी एकूण 130 महिलांशी लग्न केलं  होतं.
 
'लग्न करणं हे पवित्र आहे आणि त्यासाठीच मला या जगात पाठवण्यात आलं आहे' असं त्यांचं म्हणणं होतं. आजारपणामुळे त्यांचं शनिवारी निधन झालं. मात्र, त्यांना कोणत्या आजाराने ग्रासलं होतं हे कळू शकलं नाही.   
 
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून बेलो आजारी होते आणि शेवटचा श्वास त्यांनी आपल्या राहत्या घरीच घेतला. ''कोणताही पुरूष जेवढे हवे तेवढे लग्न करू शकतो असं कुराणामध्ये म्हटलं आहे'' असं ते मध्यंतरी म्हणाले होते. त्यामुळे चांगलाच वादही निर्माण झाला होता.   2008 साली त्यांच्यावर अनेक मौलवींनी टीका केली होती. मात्र,  लग्न करत राहणं हे माझं पवित्र ध्येय आहे असं ते म्हणायचे . त्यांनी एकूण 130 लग्न केली असून त्यांच्यापश्चात 203 मुलं आहेत.