शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

मसूद अजहर मोकळाच!

By admin | Updated: January 19, 2016 10:22 IST

पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अजहर याला पाकिस्तान सरकारने अद्याप अटक केली नाही किंवा त्याला नजरकैदही केले नाही.

नवी दिल्ली : पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अजहर याला पाकिस्तान सरकारने अद्याप अटक केली नाही किंवा त्याला नजरकैदही केले नाही. त्यासोबतच मसूदच्या तीन सहकाऱ्यांना ज्या प्रकरणात स्थानबद्ध करण्यात आले आहे, त्याचा पठाणकोट हल्ल्यात काडीचाही संबंध नाही.गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, अजहरच्या विरोधात पठाणकोट दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आणि भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांना जबाबदार असलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या या म्होरक्याविरुद्ध कारवाई होण्याची शक्यताही दिसत नाही.पाकिस्तानी सुरक्षा संस्थांनी जैश-ए-मोहम्मदच्या तीन कनिष्ठ स्तरावरील पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध केले आहे. परंतु त्यांना काही दस्तऐवजांच्या संदर्भात पकडण्यात आले आहे आणि त्यांच्या अटकेचा पठाणकोटमधील हल्ल्याशी काहीही संबंध नाही. पठाणकोट हल्ल्याच्या घटनेनंतर मसूद अजहर याला स्थानबद्ध करण्यात आल्याच्या बातम्या आल्या होत्या, ज्या असत्य होत्या आणि काही पाकिस्तानी संस्थांनीच या बातम्या पेरल्याचा संशय आहे, असे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. जैश-ए-मोहम्मदच्या एखाद्या सदस्याला आपण अटक वा स्थानबद्ध केल्याचे वा त्यांच्याविरुद्ध पठाणकोट हल्ल्याच्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पाकिस्तानने अद्याप भारताला अधिकृतरीत्या कळविलेले नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)