लंडन : पाकिस्तानातील क्रिकेटपटू व राजकीय नेता असणाऱ्या इम्रान खानने बीबीसीची वेदर गर्ल रिहाम खान हिच्याशी विवाह केल्याची कबुली दिली आहे. काही आठवड्यांपासून या संदर्भात चाललेल्या चर्चेवर इम्रानने पूर्णविराम दिला आहे. मी आता पाकिस्तानला जाणार असून, माझ्या विवाहाचे वृत्त देशवासीयांना सांगणार आहे, असे इम्रानने म्हटले आहे. मला काहीही लपवायचे नाही, असे इम्रानने हिथ्रो विमानतळावर पाकिस्तानी पत्रकारांना सांगितले. विवाह करणे हा काही गुन्हा नाही, असे इम्रानने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
रिहाम खानशी विवाह केला- इम्रान
By admin | Updated: January 6, 2015 23:59 IST