शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सौदी अरेबियातील नव्या करामुळे अनेक भारतीयांचे कुटुंबीय माघारी

By admin | Updated: June 23, 2017 00:21 IST

सौदी अरेबिया सरकारच्या एका नवीन करामुळे परदेशांतून तिथे रोजगारासाठी गेलेल्यांना नव्या त्रासाला तोंड द्यावे लागणार आहे.

रियाध : सौदी अरेबिया सरकारच्या एका नवीन करामुळे परदेशांतून तिथे रोजगारासाठी गेलेल्यांना नव्या त्रासाला तोंड द्यावे लागणार आहे. अनेक भारतीय सौदी अरेबियामध्ये असून, या करामुळे अनेक भारतीयांच्या कुटुंबीयांना भारतात परतावे लागण्याची चिन्हे आहेत. सौदी अरेबियाने परदेशातून आलेल्या लोकांवर अवलंबून असलेल्यांवर १ जुलैपासून अवलंबित्व कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमामुळे सौदी अरेबियात रोजगार करणाऱ्यांना कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीमागे दरमहा १०० रियाल म्हणजे १७00 रुपये अवलंबित्व कर द्यावा लागेल. एखादा कर्मचारी तिथे पत्नी व दोन मुलांसह राहत असेल, तर त्याला दरमहा ३00 रियाल म्हणजेच तब्बल ५१00 रुपये कर भरावा लागेल. सौदी अरेबियामध्ये ४१ लाख भारतीय राहतात. त्या देशातील परदेशी नागरिकांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. या निर्णयामुळे अनेक भारतीय कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबीयांना भारतामध्ये परत पाठवायला सुरुवातही केली आहे. कराचा हा बोजा मोठा आहे आणि तो भरणे आम्हाला शक्य नाही, त्यामुळे आम्ही कुटुंबांना परत पाठवायचे ठरवले आहे, असे काही भारतीयांनी बोलूनही दाखविले आहे. ज्यांचे मासिक उत्पन्न दरमहा पाच हजार रियालहून (८५ हजार रुपये) अधिक आहे, त्यांनाच त्या देशात फॅमिली व्हिसा दिला जातो. एवढे उत्पन्न असणाऱ्यांना कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार प्रत्येकी १00 रियाल इतका कर देणे भागच आहे. इतकेच नव्हे, तर पुढील चार वर्षांत म्हणजे २0१0 पर्यंत या कराची रक्कम वाढवली जाणार आहे. याचा फटका भारतीयांसह सर्वच परदेशी कामगार, कर्मचाऱ्यांना बसणार आहे. परराष्ट्र मंत्रालय मात्र अजूनही गप्पभारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सौदी अरेबिया प्रशासनाशी यासंदर्भात चर्चा करावी, अशी येथील भारतीयांची इच्छा आहे. मात्र परराष्ट्र मंत्रालयाने यावर बोलण्यास नकार दिला आहे. शिवाय अन्य देशाने कोणावर आणि किती कर लावावा, हे भारताने सांगणे शक्यही नाही. त्यामुळे आपल्या कुटुंबातील अधिकाधिक व्यक्तींना मायदेशी पाठवणे हाच भारतीयांपुढे पर्याय आहे.