शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मंगळयानाचे काम व्यवस्थित सुरू

By admin | Updated: September 13, 2014 02:12 IST

मंगळ ग्रहाच्या अगदी जवळ पोहोचलेल्या भारताच्या मंगळयानाने आपले काम व्यवस्थित सुरू असल्याचा संदेश भारताला पाठवला आहे

नवी दिल्ली : मंगळ ग्रहाच्या अगदी जवळ पोहोचलेल्या भारताच्या मंगळयानाने आपले काम व्यवस्थित सुरू असल्याचा संदेश भारताला पाठवला आहे. येत्या २४ सप्टेंबर रोजी ते मंगळाच्या कक्षेत प्रवेश करणार आहे.या यानाने पाठविलेल्या या संदेशात आपली सर्व यंत्रणा उत्तमरीतीने काम करीत असल्याचे म्हटले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) टिष्ट्वटरवर प्रसिद्ध केलेल्या एका नोंदीनुसार, हे मंगळयान इस्रोकडे नियमितरूपाने संदेश पाठवीत आहे. त्यांना टेलीमेट्री सिग्नल असे संबोधले जाते. शुक्रवारी मिळालेल्या या संदेशानुसार हे यान ठरल्याबरहुकूम काम करीत आहे. या यानाने आपला ९५ टक्के प्रवास पूर्ण केला असून, मंगळाच्या कक्षेत प्रवेश करण्यासाठी त्याला आपल्या तरल इंजिनाला पुन्हा सुरू करण्याचे आव्हानात्मक काम करावे लागणार आहे. हे इंजिन गेल्या दहा महिन्यांपासून बंद ठेवण्यात आले होते. मंगळाच्या कक्षेत शिरण्यासाठी यानाला सध्याच्या असलेल्या २२ कि.मी. प्रति सेकंद या वेगाला कमी करून दीड कि.मी.प्रति सेकंद करणे गरजेचे आहे. इस्रोच्या मते, गरज पडल्यास १४ सप्टेंबरला मंगळयानाच्या दिशेला बदलले जाईल व नंतर १६ व १७ तारखांना मंगळग्रहाच्या कक्षेत शिरण्याचा सराव या यानाकडून करवून घेतला जाईल. या मोहिमेत २५० अभियंते सहभागी होणार आहेत. २१ सप्टेंबर रोजी मंगळ ग्रहाच्या कक्षेत शिरण्यासाठी यानाला संबंधित आज्ञा दिल्या जातील व २२ रोजी त्याच्या तरल इंजिनाची चाचणी घेतली जाणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)