शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वांत लांब कार

By admin | Updated: February 11, 2017 00:51 IST

अमेरिकेतील एकाने जगातील सर्वांत लांब कार तयार केली आहे. सामान्य कारची लांबी सरासरी १६ फूट असते आणि ती चार चाकांवर धावते

वॉशिंग्टन : अमेरिकेतील एकाने जगातील सर्वांत लांब कार तयार केली आहे. सामान्य कारची लांबी सरासरी १६ फूट असते आणि ती चार चाकांवर धावते; परंतु या कारची लांबी ११० फूट असून, तिला तब्बल २4 चाके आहेत. ही कार रस्त्यावर धावताना वेगळेपणामुळे प्रत्येकाचे लक्ष वेधून घेते. कॅलिफोर्नियाचे कस्टम कार गुरू जे आर्हबर्ग यांना कारच्या रुपड्यात बदल करून ते अधिक उठावदार करण्याचा छंद आहे. त्यांनीच ही कार तयार केली. ‘द अमेरिकन ड्रीम’ असे या कारचे नाव आहे. जगातील सर्वांत लांब लिमोजिन म्हणून ती ओळखली जाते. या कारची ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये नोंद झाली आहे. २७.१ कोटी रुपये मोजण्याची तयारी असेल, तर तुम्ही ही कार आपल्या घरी आणू शकता. लांबीशिवाय ऐषोआराम, स्टाईल आणि सुरक्षेबाबत ती इतर अव्वल कार्सच्या तोडीस तोड आहे. या कारमध्ये काय नाही. शाही बाथटब, डायव्हिंग बोर्ड, किंग साईज वॉटर बेड, लिव्हिंग रूम आणि दोन चालकांच्या खोल्या आहेत. विशेष म्हणजे या कारला सरळ किंवा मधून दुमडून चालविता येऊ शकते. तिला समोरून किंवा मागूनही चालविता येते. ही कार अनेक चित्रपटांत चमकली आहे. तिचे दोन भाग होऊ शकतात तसेच हे दोन भाग ट्रकमध्ये घालून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येतात. आपली लांबी आणि विशेष रचनेमुळे ही कार लोकांना आकर्षित करते.