शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

YouTube वर लवकरच दिसणार लाइव्ह टीव्ही

By admin | Updated: March 1, 2017 09:11 IST

डिजिटल माध्यमांच्या क्रांतीचं जाळं दिवसेंदिवस वेगानं विस्तारत आहे.

ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. 1- डिजिटल माध्यमांच्या क्रांतीचं जाळं दिवसेंदिवस वेगानं विस्तारत आहे. स्वतःची कला जगासमोर नेण्यासाठी आताची स्मार्ट पिढीसुद्धा इंटरनेटचा प्रभावी वापर करताना पाहायला मिळते आहे. सोशल नेटवर्किंगमधील आघाडीची कंपनी यू ट्युबनं एक पाऊल पुढे टाकत लाइव्ह टीव्हीची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली आहे. यू ट्युबनं अमेरिकेतल्या मुख्य 4 नेटवर्क पुरवठादार कंपन्यांशी करार केला असून, यात अमेरिकन प्रसारण नेटवर्कसह केबल चॅनेलवाल्यांचाही सहभाग आहे. पुढच्या महिन्यापासून अमेरिकेत लोकांना यू ट्युबवर लाइव्ह टीव्ही पाहता येणार आहे, असं वृत्त टेलिग्राफनं दिलं आहे. मात्र त्यासाठी ग्राहकांना महिन्याला 35 डॉलर एवढे पैसे मोजावे लागणार आहेत, अशी माहिती यू ट्युबच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुसान व्होजसिस्की यांनी दिली आहे. लॉस एन्जलिसमधल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यू ट्युब लाइव्ह व्हिडीओसाठी जवळपास 40 नेटवर्क पुरवठादार कंपन्यांशी करार करण्याच्या विचारात असून, त्यात व्हॉल्ट डिस्नी ईएसपीएनचाही समावेश आहे. यू ट्युब अमेरिकेतल्या डिश नेटवर्क स्लिंग टीव्ही, एटी अँड टीएस डायरेक टीव्ही आणि सोनी कॉर्प प्ले स्टेशनशी स्पर्धा करण्याच्या तयारीत आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी यू ट्युबला ग्राहकांना चांगल्या ऑफर्सही द्याव्या लागणार आहेत. गुगलनं यु ट्यूबच्या माध्यमातून एक व्यासपीठच उपलब्ध करून दिलं असून, आता हे व्यासपीठ जगभर पसरलं आहे. यू ट्युबवर कोणीही वापरकर्ता पाहिजे ते व्हिडीओ पाहू शकतो किंवा त्यात बदल करू शकतो. मात्र यू ट्युब स्वतः कोणतेही व्हिडीओ तयार करत नाही. डिजिटल माध्यमांत यू ट्युब हाताळणारा मोठा वर्ग असल्यानं सहाजिकच यू ट्युबच्या लाइव्ह टीव्ही सुविधेलाही मोठ्या प्रमाणात पसंती मिळण्याची शक्यता आहे.