शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

लिबियाच्या अपह्रत विमानातून सर्व प्रवाशांची सुटका

By admin | Updated: December 23, 2016 20:43 IST

लिबियाच्या प्रवासी विमानाचे अपहरण करणा-या अपहरणकर्त्यांनी विमानातील सर्व 118 प्रवाशांची सुटका केल्याची माहिती आहे.

 ऑनलाइन लोकमत 

वालेटा, दि. 23 - लिबियाच्या प्रवासी विमानाचे अपहरण करणा-या अपहरणकर्त्यांनी विमानातील सर्व 118 प्रवाशांची सुटका केल्याची माहिती आहे. आफ्रिकिया एअरलाईन्सचे एअरबस ए 320 विमान अपहरणकर्त्यांनी माल्टा विमानतळावर उतरवले आहे. दक्षिण लिबीयातील सीबहा येथून या विमानाने त्रिपोलीसाठी उड्डाण केले होते. 
 
अपहरणकर्त्यांनी विमानाचा ताबा घेतल्यानंतर त्यांनी हे विमान माल्टा येथे उतरवण्यास भाग पाडले. या विमानात 111 प्रवासी, सात क्रू सदस्यांसह एकूण 118 जण आहेत. अपहरणकर्त्यांनी ते गद्दाफी समर्थक असल्याचा दावा केला आहे.  विमानातील सर्वच्या सर्व 111 प्रवाशांना सोडण्याची आपली इच्छा आहे. पण सात क्रू सदस्यांना सोडणार नसल्याचे अपहरणकर्त्यांनी सांगितले. 
 
अपहरणकर्त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत ते अजून स्पष्ट झालेले नाही. आपतकालीन यंत्रणा सज्ज असून सुरक्षा जवानांनी आपआपली जागा घेतली आहे. अपहरणकर्त्यांशी वाटाघाटीचे प्रयत्न सुरु आहेत. माल्टाच्या पंतप्रधानांनी टि्वट करुन या अपहरणाची माहिती दिली. आपातकालीन यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण लिबीयातील सीबहा येथून या विमानाने त्रिपोलीसाठी उड्डाण केले होते. माल्टा लिबीयापासून 500 किमी अंतरावर आहे. 
 
2011 मध्ये लिबीयन हुकूमशहा मोअमर गद्दाफीची सत्ता उलथवल्यापासून लिबीयामध्ये गोंधळ सुरु आहे. विविध दहशतवादी गट देशाच्या विविध भागांवर नियंत्रण मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत. लिबीयन सरकारच्या फौजांनी नुकतेच सर्टी शहरावर नियंत्रण मिळवले. जून 2015 पासून हा भाग इसिस दहशतवाद्यांचा गड बनला होता.