शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कॅनडामध्ये लिबरल पक्षाचा दणदणीत विजय

By admin | Updated: October 21, 2015 04:22 IST

गेली दहा वर्षे सत्तेमध्ये असणाऱ्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला धक्का देत जस्टीन ट्रुडेऊ यांच्या नेतृत्वाखाली लिबरल पक्षाने विजय मिळविला आहे. ४३ वर्षीय जस्टीन ट्रुडेऊ हे माजी

ओट्टावा : गेली दहा वर्षे सत्तेमध्ये असणाऱ्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला धक्का देत जस्टीन ट्रुडेऊ यांच्या नेतृत्वाखाली लिबरल पक्षाने विजय मिळविला आहे. ४३ वर्षीय जस्टीन ट्रुडेऊ हे माजी पंतप्रधान पिएरे ट्रुडेऊ यांचे पुत्र आहेत. २००६ पासून कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे स्टीफन हार्पर पंतप्रधानपदी होते. लोकांचा कौल आपल्याला मान्य असून आपण पायउतार होत असल्याचे त्यांनी तात्काळ जाहीर केले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जस्टीन ट्रुडेऊ यांचे अभिनंदन केले आहे.कॅनेडियन संसदेच्या ३३८ एकूण जागांपैकी बहुमतासाठी १७७ जागा मिळविणे आवश्यक असते. यासाठी महत्त्वाच्या तिन्ही पक्षांनी यासाठी कंबर कसल्याचे दिसून येत होते. आज जाहीर झालेल्या निकालांमध्ये लिबरल पक्षाला १८४, कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला ९९, न्यू डेमोक्रॅटस्ना ४४, ब्लॉक क्यूबेकना १०, तर ग्रीन पक्षाला केवळ एक जागा मिळाली आहे. आपला कार्यकाळ यशस्वी ठरला होता, हे दाखविण्यासाठी हार्पर यांनी प्रूवन लीडरशिप फॉर स्ट्राँग कॅनडा अशी घोषणा केली होती, तर न्यू डेमोकॅ्रटिकने रेडी फॉर चेंज, लिबरलने रिअल चेंज अशा घोषणा दिल्या होत्या. ७८ दिवसांचा आजवरचा सर्वात मोठा प्रचारकाळ हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य होते. बहुपक्षीय पद्धतीत कॉन्झर्व्हेटिव्ह, लिबरल, न्यू डेमोकॅ्रटस्, ब्लॉक क्यूबेकियन्स व ग्रीन हे महत्त्वाचे पक्ष आहेत. त्यामध्ये स्टीफन हार्पर, लिबरलचे जस्टीन ट्रुडेऊ, न्यू डेमोक्रॅटस्चे थॉमस म्युलकेअर यांच्यात खरी चुरस होती. (वृत्तसंस्था)हार्पर कोण होते?स्टीफन हार्पर हे गेली जवळजवळ १० वर्षे कॅनडाचे पंतप्रधान होते. त्यांच्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाने २००६ साली अल्पमतातील सरकार स्थापन करीत सत्तेमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून ते या पदावरून देशाचा कारभार सांभाळत आहेत. १९९३ आणि १९९७मध्ये कॅलगरी वेस्ट, तर २००२ पासून कॅलगरी साऊथ वेस्ट मतदारसंघातून ते संसदेत निवडून जात आहेत. दशकभराच्या काळामध्ये कॅनडाच्या दृष्टीने जागतिक राजकारणात अत्यंत महत्त्वाची कामगिरी त्यांनी बजावली असली, तरी ही निवडणूक त्यांच्यासाठी सोपी नाही, असे ओपिनियन पोलमधून स्पष्ट झाले होते.नव्या पंतप्रधानांविषयी...जस्टीन ट्रुडेऊ हे कॅनडाचे माजी पंतप्रधान पिएरे ट्रुडेऊ यांचे पुत्र आहेत. १९७१ साली त्यांचा ओटावा येथे जन्म झाला. पिएरे १९६८ ते ७९ आणि १९८० ते ८४ इतका प्रदीर्घ काळ कॅनडाच्या पंतप्रधानपदी होते. कॅनडा भेटीवर असताना अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी एकेदिवशी जस्टीन देखील पंतप्रधान होईल असे भाकीत केले होते, ते आता खरे ठरले आहे. जस्टीन सोफी ग्रेगॉयर यांच्याशी २००६मध्ये विवाहबद्ध झाले. ते पॅपिनेऊ मतदारसंघातून संसदेत निवडून जातात.हार्पर यांच्यावरील टीकाहार्पर यांच्या कार्यकाळावर काही प्रश्नचिन्हे उभी केली गेली होती. हार्पर यांनी कॅनडा सरकारचे रूपांतर हार्पर सरकारमध्ये केले, असा आरोप त्यांच्यावर केला जातो. ते सरकारमध्ये आल्यापासून वित्तीय तूट वाढली आणि कर्ज वाढले, असाही आरोप त्यांच्यावर केला जात आहे. २०१० च्या जी-२० सभेसाठी अब्जावधी डॉलर्सचा अनाठायी खर्च केल्याबद्दल त्यांना दोषी धरले जाते.निवडणुकीतील मुद्देकॅनडातील अंतर्गत पर्यावरणीय मुद्दे, स्थलांतरितांचे प्रश्न, त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेतील सुधारणा हे या निवडणुकांमधील महत्त्वाचे मुद्दे होते. कॅनडामध्ये जगभरातील विविध देशांमधून अनेक धर्मांचे, अनेक वंशांचे लोक स्थायिक झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषा, त्यांची मूल्ये यांची जपणूक होण्यावरही व्यवस्थेकडून भर दिला जातो. त्याचप्रमाणे, फ्रेंच बोलणाऱ्या नागरिकांचे प्रमाणही तितकेच मोठे आहे. त्यामुळे समन्यायी वागणुकीकडेही लक्ष देणे कॅनडा सरकारची महत्त्वाची जबाबदारी ठरते.19 भारतीय वंशाचे खासदार..40 भारतीय वंशाचे खासदार रिंगणात होते. सुएरे न्यूटन या मतदारसंघामध्ये चारही उमेदवार भारतीय वंशाचे होते. दीपक ओब्राय हे खासदार सलग सातव्यांदा विजयी झाले आहेत.2015 च्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळेस १९ भारतीय वंशाचे खासदार निवडून गेले आहेत.