शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

हा रुसवा सोड... पुरे हा अबोला!

By admin | Updated: January 4, 2017 02:33 IST

नवरा आणि बायकोचं भांडण तसं भारतीयांना नवीन नाही. भारतातच नव्हे, जगभर नवरा-बायकोची भांडणं होतच असताना. पण आदळआपट करून नवरा - बायको रुसवा सोडून

टोकियो : नवरा आणि बायकोचं भांडण तसं भारतीयांना नवीन नाही. भारतातच नव्हे, जगभर नवरा-बायकोची भांडणं होतच असताना. पण आदळआपट करून नवरा - बायको रुसवा सोडून पुन्हा एकत्र येतात. जगाच्या पाठीवर नवरा - बायकोतील नातं सारखंच आहे, याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. तब्बल वीस वर्षे बायकोशी रुसवा करणाऱ्या जपानमधील या पती महाशयांनी अखेर आपला राग सोडला आणि कुटुंबातील मुलाबाळांना आनंदाचा नवा क्षण गवसला. ओटोयू यांचे तसं सुखी कुटुंब आहे. पत्नी, तीन मुलांसह ते गुण्यागोविंदाने राहतात. पण, माशी कुठे तरी शिंकली अन् यांचा पारा वाढला. त्यांचा १८ वर्षांचा मुलगा योशिकी याने एका टीव्ही शोमध्ये ही खंत बोलून दाखविली आणि आपल्या आई - वडिलांना ‘बोलतं’ करण्यासाठी मदतही मागितली. आम्हाला जेव्हापासून कळू लागलं, तेव्हापासून, आम्ही वडिलांना आणि आईला बोलताना बघितलेलंच नाही, असं योशिकी आणि त्याच्या दोन बहिणींनी सांगितलं. बरं, बायकोबद्दल एवढा राग का? तर, म्हणे मुलांच्या जन्मानंतर ती सतत मुलांच्या संगोपनातच व्यस्त असायची. या दाम्पत्याला बोलते करण्यासाठी एका पार्कमध्ये काही नागरिकांनी त्यांची भेट घडवून आणली. याच पार्कमध्ये ते प्रथम भेटले होते. एका बेंचवर हे दाम्पत्य बसलं आणि ओटोयू यांनी आपल्या शब्दांना वाट करुन दिली अन् २० वर्षांचा रुसवा क्षणात दूर झाला.