शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय लोकशाहीच्या यशाचे गमक जाणून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2017 00:43 IST

राजकारणापासून लष्कराला अलिप्त ठेवण्यात भारत कसा यशस्वी झाला याचे गमक जाणून घ्या, असा सल्ला पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख

इस्लामाबाद : राजकारणापासून लष्कराला अलिप्त ठेवण्यात भारत कसा यशस्वी झाला याचे गमक जाणून घ्या, असा सल्ला पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी तेथील लष्करी अधिकाऱ्यांना दिला आहे.जनरल बाजवा यांनी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात रावळपिंडी येथील लष्करी अधिकाऱ्यांना उद्देशून केलेल्या भाषणाचा वृत्तांत प्रसिद्ध झाला आहे.स्वतंत्र देश म्हणून स्थापन झाल्यापासूनच्या गेल्या सात दशकांपैकी निम्म्याहून अधिक काळ पाकिस्तानात लष्करी राजवट राहिली आहे. तेथील सत्ताकारणात लष्कर नेहमीच वजनदार भूमिका बजावत असते. परंतु जनरल बाजवा यांना लष्कराने राजकारणात पडणे अजिबात मान्य नाही व लष्कराने लोकशाही शासनव्यवस्थेत आपली मर्यादा ओळखून राहावे, असे त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले.याच संदर्भात त्यांनी भारताचे उदाहरण दिले व तेथील लोकशाही लष्कराला राजकारणापासून पूर्णपणे दूर ठेवण्यात यशस्वी झाल्याचे सांगितले. या अनुषंगाने जनरल बाजवा यांनी भारतविषयक एक अमेरिकी अभ्यासक स्टिव्हन आय. विल्किन्सन यांनी लिहिलेले ‘आर्मी अ‍ॅण्ड नेशन: दि मिलिटरी अ‍ॅण्ड इंडियन डेमॉक्रसी’ हे पुस्तक आवर्जून वाचण्याचा सल्ला दिला. विल्किन्सन हे येल विद्यापीठात निलेकेनी अध्यासनाचे प्राध्यापक आहेत.सन २०१५ मध्ये प्रसिद्ध झालेले हे पुस्तक अमेरिकेत व भारतातही टिकाकारांकडून वाखाणले गेले. भारतीय लोकशाही व्यवस्थेने लष्कराला राजकारणापासून अलिप्त ठेवण्यात कसे व का यश मिळविले याचे अभ्यासपूर्वक विवेचन त्यांनी या पुस्तकात केले आहे. (वृत्तसंस्था)