शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लीक ऑडिओतून खळबळजनक खुलासा! कुटुंब संपलं पण इराणचे नवे सुप्रीम लीडर मृत्यूच्या दाढेतून परतले कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 11:15 IST

२८ फेब्रुवारी रोजी इराणच्या सत्ताकेंद्रावर झालेल्या भीषण मिसाइल हल्ल्यात इराणचे नवे सुप्रीम लीडर मोज्तबा खामेनेई हे मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचावल्याची माहिती समोर आली आहे.

इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धाने आता भीषण वळण घेतले आहे. २८ फेब्रुवारी रोजी इराणच्या सत्ताकेंद्रावर झालेल्या भीषण मिसाइल हल्ल्यात इराणचे नवे सुप्रीम लीडर मोज्तबा खामेनेई हे मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचावल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या हल्ल्यात त्यांचे वडील आणि माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्यासह कुटुंबातील अनेक सदस्यांचा अंत झाला आहे. एका लीक झालेल्या ऑडिओ रेकॉर्डिंगमुळे या गुप्त राहिलेल्या घटनेचा मोठा खुलासा झाला आहे.

बगीच्यात फिरायला गेले अन् जीव वाचला!

'दी टेलिग्राफ'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:३२ वाजता तेहरानमधील सुप्रीम लीडरच्या निवासस्थानावर 'ब्लू स्पॅरो' मिसाइलने हल्ला करण्यात आला. ज्यावेळी हे मिसाइल थेट खामेनेई यांच्या घरावर पडले, त्याच्या काही मिनिटे आधीच मोज्तबा खामेनेई घराबाहेर बगीच्यात फेरफटका मारण्यासाठी निघाले होते. या काही पावलांच्या अंतरामुळेच त्यांचा जीव वाचला. मात्र, घराचा ढिगारा अंगावर पडल्याने त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे.

कुटुंबाचा आणि टॉप कमांडर्सचा खात्मा

या हल्ल्याचे स्वरूप इतके भीषण होते की, त्यात मोज्तबा खामेनेई यांच्या पत्नीचा आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. इतकेच नाही तर त्यांचे साले आणि इराणच्या सुरक्षा यंत्रणेतील महत्त्वाचे स्तंभ मानले जाणारे आयआरजीसी प्रमुख मोहम्मद पाकपूर आणि संरक्षण मंत्री अझीझ नासिरझादेह हे देखील या हल्ल्यात ठार झाले आहेत. संपूर्ण खामेनेई घराण्याला एकाच वेळी संपवण्याचा हा अमेरिकेचा कट होता, असा दावा या ऑडिओमध्ये करण्यात आला आहे.

मोज्तबा खामेनेई नेमके कुठे आहेत?

या थरारक हल्ल्यापासून मुज्तबा खामेनेई सार्वजनिकरीत्या समोर आलेले नाहीत. त्यांच्या प्रकृतीबाबत आणि ठावठिकाण्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुज्तबा खामेनेई कोमात असल्याचा दावा केला आहे, तर काही मीडिया रिपोर्टनुसार त्यांच्यावर रशियामध्ये गुप्तपणे उपचार सुरू आहेत. इराण सरकारने मात्र अद्याप यावर अधिकृत भाष्य केलेले नाही.

३ आठवड्यांपासून युद्ध धगधगतंय!

२८ फेब्रुवारीला सुरू झालेला हा संघर्ष आता तिसऱ्या आठवड्यात पोहोचला आहे. इराणच्या राजधानीत शिरून अमेरिकेने केलेल्या या हल्ल्यामुळे मध्यपूर्वेत संतापाची लाट असून, कोणत्याही क्षणी या युद्धाचा भडका अधिक उडू शकतो, अशी चिन्हे दिसत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Leaked Audio Reveals Iran Leader's Survival, Family Lost in Attack

Web Summary : A leaked audio reveals Iran's new leader narrowly escaped a missile attack that killed his family, including his father, and top commanders. Mojtaba Khamenei's whereabouts remain unknown, fueling speculation about his health after the alleged US strike sparked Mid-East tensions.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर