शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मरण्याआधी अमेरिकेत रक्तपात पाहण्याची अल जवाहिरीची शेवटची इच्छा

By admin | Updated: April 22, 2017 17:18 IST

अलकायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आयमन अल जवाहिरीची अमेरिकेवर हल्ला करण्याची शेवटची इच्छा आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 22 -  अलकायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आयमन अल जवाहिरीने त्याची शेवटची इच्छा बोलून दाखवली आहे. डोळे मिटण्याआधी अमेरिकेवर मोठा हल्ला करण्याची जवाहिरीची इच्छा आहे.  मरण्याआधी अमेरिकेत आपल्याला मोठा रक्तपात झालेला पाहायचा आहे असे त्याने जवळच्या सहका-यांजवळ बोलून दाखवले. न्यूजवीकने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. जवाहिरी आणि हमजा बिन लादेन या दोघांना आयएसआय या पाकिस्तानच्या गुप्तचर संघटनेने आसरा दिल्याची शक्यता असून, हे दोघे कराचीमध्ये असावेत असे न्यूजवीकने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. 
 
अमेरिकेने अफगाणिस्तानात अलकायदा विरुद्ध मोहिम उघडल्यापासून पाकिस्तान अल जवाहिरीला संरक्षण देत आहे. अमेरिका जवाहिरीच्या मागावर असून, मागच्यावर्षी जानेवारी महिन्यात अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यातून जवाहिरी थोडक्यात बचावला होता असे न्यूजवीकने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. 
 
जवाहिरी ज्या खोलीत होता त्याच्या पुढच्या खोलीवर अमेरिकेने ड्रोन हल्ला केला. त्यावेळी दोन खोल्यांना जोडणारी भिंत कोसळून ढिगारा जवाहिरीच्या अंगावर पडला. त्यात त्याचा चष्मा तुटला. पण सुदैवाने तो बचावला असे दहशतवाद्याने न्यूजवीकला सांगितले. 2001 पासून अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यातून जवाहिरी अनेकदा बचावला आहे. ज्या अफगाणिस्तानमध्ये जवाहिरी-लादेन जोडीने राज्य केले त्याच अफगाणिस्तानातील काही भागांमध्ये आता जवाहिरीला थारा दिला जात नाही असे न्यूजवीकने म्हटले आहे.