शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

२६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड जकी-उर-रहमान लखवीला टेरर फंडिंग प्रकरणी अटक

By कुणाल गवाणकर | Updated: January 2, 2021 15:44 IST

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून लखवीला अटक

इस्लामाबाद: मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या जकी-उर-रहमान लखवीला टेरर फंडिंग प्रकरणात अटक झाली आहे. दहशतवाद्यांना आर्थिक मदत दिल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या पंजाबमध्ये लखवीला अटक करण्यात आली. मात्र त्याच्या अटकेचा मुंबईवरील २६/११ हल्ल्याशी कोणताही संबंध नाही.जकी-उर-रहमान लखवीला अटक करण्यात आल्याच्या वृत्ताला पंजाबच्या दहशतवादविरोधी विभागाच्या प्रवक्त्यांनी दुजोरा दिला. लखवीला लाहोरमधून अटक करण्यात आली. दवाखान्याच्या नावाखाली मिळणारा निधी दहशतवादी कारवायांसाठी वापरल्याचा आरोप लखवीवर आहे. २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेनं लखवीला आंतरराष्ट्रीय स्तरावरील दहशतवादी घोषित केलं.फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या (FATF) काळ्या यादीत समावेश होऊ नये यासाठी पाकिस्तानकडून विविध क्लृप्या वापरल्या जातात. आपण दहशतवाद्यांविरोधात कारवाया करत असल्याचा देखावा पाकिस्तानकडून उभा केला जातो. याआधी नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानच्या एफआयएनं मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत मुंबईवरील हल्ल्यात सहभागी असलेल्या ११ जणांचा समावेश केला होता. २६ नोव्हेंबर २००८ रोजी लष्कर-ए-तोयबानं मुंबईतील अनेक ठिकाणांवर दहशतवादी हल्ले केले होते. या हल्ल्यांमागे पाकिस्तानचं लष्कर आणि त्यांची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा हात असल्याचे पुरावे भारताला मिळाले. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात दीडशेहून अधिक जण मृत्यूमुखी पडले. यामध्ये परदेशी नागरिकांचादेखील समावेश होता. जकी-उर-रहमान लखवी या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. त्याला पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्याची सुटका करण्यात आली.

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाLashkar-e-taibaलष्कर-ए-तोयबा